Home बुलडाणा पोलीस दादाकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश !

पोलीस दादाकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश !

334

जमीर शाह

डोणगांव

पोलीस दादाकडून सामाजिक बांधिलकीचा संदेश !
इतरांनी सुद्धा गरिबांची मदत करण्या साठी प्रोत्साहन.
हीच वेळ आहे गरिबांच्या प्रति कृतज्ञाता दाखवण्याची.
संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातलेला आहे कित्येक महासत्तानी स्वतःला कोंडून घेतले अश्यातच आपल्या देशात देखील कोरोनाच्या विषाणूचा शिरकाव झाला त्याचा फैलाव होऊनये यासाठी शासनाने टोकाचा निर्णय घेत देशभरात संचार बंदी कर्फ्यु लावले त्याने कित्येक गरीब ज्यांचे हातावरचे जीवन आहे कमावतील तर खातील अशी त्यांची अवस्था आहे अशातच एका एकी लागलेल्या कर्फ्यु मध्ये त्यांचे काम बंद झाले आणि हे गरीब दुसऱ्या समोर हात सुद्धा पसारु शकत नाहीत तेव्हा आपले कर्तव्य समजून फुल ना फुलांची पाकळी या उदात्त हेतूने डोणगांव ठाणेदार दीपक पवार व त्यांच्या स्टॉप ने डोणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेवाभावी वृत्तीच्या संस्था,परिवार व लोकांना परिस्थिती सांगून मदत मागितली व त्या मदतीतून किराणा सामान घेऊन गरिबांच्या घरी नेऊन पोचवला यात पेट्रोलिंग दरम्यान दिसून येणारे गरीब आणि शांतता कमिटीच्या सदस्यांनी सुचवलेल्या गरिबांच्या घरी पोलीस विभागाने हा किराणा पोहचवला.
“पोलीस दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरिबांना मदतीचा एक संदेश दिला”