Home बुलडाणा दही हंडी पाहण्यासाठी गेल्या अन, विपरितच घडलं ,

दही हंडी पाहण्यासाठी गेल्या अन, विपरितच घडलं ,

219

दहीहंडीत गॅलरी कोसळून १ मुलगी ठार, १ गंभीर

अमीन शाह

देऊळगावराजा

दहीहंडी साठी बांधलेल्या चोरीसह गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एक चिमुकली जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता. ७) रात्री आठच्या सुमारास शहरातील मानसिंग पुरा येथे घडली. जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीसाठी बंद अवस्थेत असलेल्या एका घराच्या गॅलरीवर दोर बांधण्यात आली होती. त्यावेळी सिमेंटच्या पिलर सह लोखंडी गॅलरी खाली कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण वय ९ वर्ष ही चिमुकली जागीच ठार झाली. तर अल्फिया शेख हाफिज ही ८ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.तिला उपचारा साठी जालना येथील रुग्नल्यातभरती करण्यात आहे , घडलेल्या घटने मुळे शहरात दुःख वायकत केला जात आहे ,