Home बुलडाणा शाळेच्या मेकझीमो गाडीला एसटी बसची धडक 17 विध्यार्थीयासह चालक ही जखमी ,

शाळेच्या मेकझीमो गाडीला एसटी बसची धडक 17 विध्यार्थीयासह चालक ही जखमी ,

191

सिंदखेड राजा भगवान साळवे
शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या मॅक्झिमो गाडीला भरधाव येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अठरा विद्यार्थी आणि मॅक्झिमो चालक जखमी झाले आहे यातील चालक आणि काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत जखमी विद्यार्थी आणि चालकाला उपचारासाठी जालना येथे करण्यात आले आहे सदर अपघात बीबी मांडवा रस्त्यावर सकाळी पावण्यात दहा वाजता एका वळणावर झाला अपघात घडतात बस चालक घटनास्थळावरून पसार झाला
याबाबत मिळालेली माहितीनुसार बिबी येथील सहकार विद्या मंदिराची मॅक्झिमो गाडी सावखेड नागरे डोरवी मलकावर पांग्रा येथून दररोज शाळेत विद्यार्थी घेऊन जातात नेहमीप्रमाणे आज सकाळी विद्यार्थी घेऊन जात असताना मांडवा बीबी रस्त्यावर एका वळणावर एम एच 40 ए क्यू 62 58 या क्रमांकाची चिखला बुलढाणा ही समोरून येणारी भरधाव बसने समोरासमोर MH 28
5561 या क्रमांकाच्या मॅक्झिमो गाडीला जोरदार धडक दिली यावेळी पाऊस सुरू असल्याने दोन्ही गाडीचे ब्रेक लागले नाही त्यामुळे अपघात झाला अपघात घडतात आपघातग्रस्त विद्यार्थ्यांनी एकच कल्लोळ केला त्याच वेळेस सहकार विद्या मंदिर च्या बस जात असताना त्यांनी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना तातडीची मदत करून उपचारासाठी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले या अपघातात समर्थ रामप्रसाद शिंदे धनराज योगेश शिंदे अक्षय गजानन मुरकुट पार्थ अतुल शेळके सुदर्शन अंबादास शिंदे राधा गजानन मुरकुट ओम रामेश्वर उगले धनराज गजानन पालवे कार्तिक रामेश्वर उगले स्वाती शिवाजी पाचपोर भागवत ज्ञानेश्वर उगले निवृत्ती रत्नाकर पंखुले दिपाली योगेश शिंदे सार्थक मंगळवेढे समर्थ नागरे लक्ष्मी शिंदे लक्ष्मी गणेश गर्जे हे अठरा विद्यार्थी जखमी झाले तर मॅक्झिमो चा चालक गजानन पालवे हा गाडीत फसल्याने टामि आणि गजने दरवाजा वाकवून त्याला बाहेर काढले ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जखमीना जालना येथे नेण्यात आले आहे अपघात करतात बस चालक घटनास्थळावरून फरार झाला दरम्यान सकाळीच पाऊस सुरू असताना बस चालक अत्यंत जोराने बस चालवत असल्याचे प्रवासी शिवाजी सानप यांनी सांगितले