Home बुलडाणा भरधाव कंटेनरची उभ्या असलेल्या काळी -पिवळीला धडक दहा प्रवासी जखमी ,

भरधाव कंटेनरची उभ्या असलेल्या काळी -पिवळीला धडक दहा प्रवासी जखमी ,

147

 

अमीन शाह ,

मलकापूर बुलडाणा ,
भरधाव कंटेनरची उभ्या असलेल्या काळी -पिवळीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुंदडा पेट्रोल पंप जवळ ८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपरी ३ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खामगाव कडून मलकापूरच्या दिशेने येत असलेली काळीपिवळी क्र. एम. एच. ३० एफ ९४०३ ही रस्त्यावर जनावरे उभी असल्याने थांबली असतानाच मागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर क्र. जे. एच. १० बी.जे. ३२६३ ने काळी पिवळीला धडक दिली. ही धडक एवढी भिषण होते की, अक्षरक्ष: काळी-पिवळी ने दोन पलट्या l घेऊन रस्त्याच्या कडेला फरपडत गेली. यामध्ये रस्त्यावर उभी असलेली दोन जनावरे ठार झाली.
या अपघातात ज्ञानेश्वर भगवान कुराडे (वय २८ वर्ष) रा. पान्हेरा, सपना न्यानेश्वर कुराडे (वय २३ वर्ष) रा. पान्हेरा, सुशिलाबाई शिंदे (वय ६५ वर्ष) रा. देऊळगाव गुजरी, रोहित मनोहर इंगळे (वय ३१ वर्ष. चिखली, विजय वसंत बोंडे रा. विटाळी, शिवाजी दिनकर किरण (वय २४ वर्ष) रा. विटाळी, राज लक्ष्मण लक्ष्मण बोंडे (वय ५० वर्ष) रा. विटाळी, भगवान लक्ष्मण सोले (वय ६० वर्ष) रा. खामगाव, शत्रुघ्न तुळशीराम टवळकर (वय ४५ वर्ष) रा. धानोरा, अब्दुल शकील अब्दुल जब्बार (वय ४५ वर्ष) रा. वडनेर तर ट्रक चालक असलम अन्सारी कयूम अंसारी ( वय ४० वर्ष) रा. छत्तीसगढ़ हे अपघातात जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णवाहिका चालक भूषण धोरात पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ जखमींना मलकापूर रुग्णालयात दाखल केले. पुढील कारवाई मलकापूर पोलिस करीत आहे.