Home बुलडाणा समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघाताला लक्षात घेता समृद्धीवर वाहतूक नियमाबद्दल पोलीस विभागा च्या...

समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघाताला लक्षात घेता समृद्धीवर वाहतूक नियमाबद्दल पोलीस विभागा च्या वतीने प्रबोधन ,

124

 

 

  • दुसरबीड प्रतिनिधि गुलशेर शेख

समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून वाढत्या अपघाताची मालिका सुरूच असल्याकारणाने चायेनल क्र 269 शीघ्रगती रोडवर अग्रवाल पेट्रोल पंप येथे वाहन ट्रक कार चालक यांना वाहतुकीचे नियमाबाबत माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले सदर कार्यक्रमास बारा ते पंधरा प्रवासी वाहन चालक हजर होते नेहमी जड़ वाहन तिसऱ्या लाईन मध्ये चालवावे वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर कमी करावा रोडवर कुठेही वाहने उभे करू नये रोडवर दिलेल्या वेग मर्यादेचे नेहमी पालन करावे दारू पिऊन वाहन चालू नये कार चालकांनी क्रमांक एक लेन चा वापर करावा ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने करावे विरुद्ध दिशेने वाहन चालू नये वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचनाप्रमाणे वाहन चालवावे चार चाकी वाहन चालविताना चालक व सहपरिवासी यांनी सिडबेल्ट चा वापर करावे वाहनातील टायरचे ठराविक अंतररावर नायट्रोजन हवा चेक करावे चायनीज किमी क्रमांक हे रोडच्या डाव्या बाजूला दगडावरती पिवळ्या रंगात लिहिलेली आहेत अपघात झाल्यास वाहन ब्रेक डाऊन झाल्यास इतरांच्या काही आवश्यकता भासल्यास हेल्पलाइन नंबर 81 81 81 81 55 व टोल फ्री क्रमांक 18 00 23 32 23 3 वर संपर्क साधावा जेणेकरून समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघाताला आळा घालण्यात येईल यावेळी पोलीस निरीक्षक गजानन उज्जैनकर मु पो केंद्र फर्दापुर आमलदार रोशन शेख दिनकर राठोड बोलोरो चालक योगेश आंधळे हे उपस्थित होते