Home बुलडाणा समृद्धी महामार्गावर भरधाव कार पुलाला धडकली एक ठार 4 जखमी ,

समृद्धी महामार्गावर भरधाव कार पुलाला धडकली एक ठार 4 जखमी ,

168

दुसरबीड प्रतिनिधि गुलशेर शेख

समृद्धी महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील एका पुलाच्या कठड्याला धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला 4 जण जखमी झाले आहेत सदर अपघात दिनांक 27 ला पावणे बारा वाजेच्या दरम्यान झाला
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीहून अर्पित बनसोडे दिनेश बनसोडे सविता बनसोडे अश्वजीत बनसोडे सुरेश बनसोडे हे एम एच 27 डी ए 1927 या क्रमांकाची कारने नाशिक कडे जात असताना सिंदखेड राजा जवळ चॅनल क्रमांक 335.9 वर ही भरधाव कार चालकाला डूलकी लागून कारवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली त्यामध्ये नाशिक चे बनसोडे कुटुंब गंभीर जखमी झाले या अपघाताची माहिती मिळतात क्यू आर व्ही चे कर्मचारी अजय पाटील अनुदीप पवार परमेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्सने जालना येथे नेले उपचार सुरू असताना यातील गंभीर जखमी सुरेश बनसोडे 50 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
जखमींना यासीन शहा व डॉक्टर बोराडे चालक दिगंबर शिंदे व प्रवीण राठोड यांनी तात्काळ ॲम्बुलन्स द्वारे जालना शासकीय रुग्णालय येथे घेऊन गेले व अपघात ग्रस्त वाहन महामार्ग पोलीस PSI शैलेश पवार पोलीस कर्मचारी नापोकाँ मुकेश जाधव ,प्रवीण राणे व महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान .भगवान गायकवाड, अजय पाटील ,श्रीराम महाजन. यांनी वाहतूक सुरळीत केली.
.