Home बुलडाणा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान *मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या...

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान *मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे वारकरी कलावंतांना सरसकट मानधन सुरू करण्याची मागणी…!

255

इतर पुजारांना मानधन आहे वरकरांना पण मानधन सुरू करा

 महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ युवा शाखा राज्य संघटक ह.भ.प. किरण महाराज शिंदे व बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.गजानन महाराज उन्हाळे पाटील युवा शाखा संपर्क प्रमुख आकाश पाटील भुतेकर व वारकरी महामंडळाचे अजीवसभासद श्री. एकनाथ महाराज तालडे व महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे वारकरी यांनी राज्य अध्यक्ष ह.भ.प.कृष्णाजी विठ्ठलराव रांजणे पाटील उपाख्य आर. के. शेठ ,विदर्भ अध्यक्ष ह.भ.प.राजेंद्र महाराज तळेकर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.दामुअण्णा महाराज शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 

प्रतिनिधी:- ( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव मही:-महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली वारकरी संप्रदायातील अनेक समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात आली महाराष्ट्र राज्य ही साधुसंतांची भुमी आहे अनेक वारकरी संप्रदायातील किर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, भारुड, भजनी, चोपदार, मंदिर पुजारी, शाहीर समाज प्रबोधनकार यामध्ये वयवर्षे पन्नास पुर्ण असलेल्या कलावंतांना सरसकट विनाअडथळा सन्मानजनक मानधन सुरू करा अशी विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री ना.शिंदे साहेब यांनी सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच पंढरपूर येथे होऊ घातलेल्या विकास कामा संदर्भात स्थानिकाना विचारात घेऊनच निर्णय घेतले जातील मठ मंदिराना हात न घालता विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी सुद्धा वारकरी संप्रदायातील परिवारातील आहे मला वारकरी संप्रदाया विषयी खूप अस्था आहे मी ह्या सर्व मागण्या पूर्ण करतो व वारकरी संप्रदायातील विविध समस्या दूर करण्यासाठी कार्य करणार महापुरुष साधुसंत यांच्या विषयी अपशब्द सहन केले जाणार नाही. यानंतर असे घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन मुख्यमंत्री महोदय यांनी दिले ह.भ.प.किरण महाराज शिंदे हे वारकरी संप्रदायातील समस्या सोडवण्यासाठी सदा अग्रेसर वारकरी आहे युवा शाखा वारकरी महामंडळाच्या वतीने पवित्र विना भेट देऊन वारकरी संप्रदायीक पद्धतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला.