Home महत्वाची बातमी दिव्यांग व्यक्तीच्याभावनांचा कोंडमारा होऊ देऊ नका सुनील आरमाळ

दिव्यांग व्यक्तीच्याभावनांचा कोंडमारा होऊ देऊ नका सुनील आरमाळ

113

जिल्हास्तरीय शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रिडा स्पर्धा सन – २०२२ – २३ संपन्न…!

प्रतिनिधी:-( रवि आणण जाधव )

देऊळगाव मही:- अपंग हा पूर्वीचा शब्द आता दिव्यांग असा आहे. दिव्यांग म्हणजे उर्वरित जे अवयव आहेत. त्यांच्याद्वारे दिव्य शक्ती प्राप्त करू शकतो अशी भावना दिव्यांग बांधवांना मिळावी. मला ऐकायला येत नाही परंतु डोळे माझे कान आहे., मला डोळ्याने दिसत नाही परंतु कान माझे डोळे आहे. दिव्यांग व्यक्ती हे सामान्य व्यक्ती सारखेच असतात. ज्या भावना, इच्छा सामान्य व्यक्ती ना असतात त्याच दिव्यांगना सुद्धा असतातच इथे होतं काय की दिव्यांग आहे म्हणून समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो खरं तर त्यांना सपोर्ट ची आवश्यकता असते. मात्र ती मिळताना दिसत नाही. त्यामुळे त्यांना समाजात मुक्त पणे वावरता येत नाही. कारण पालकांपासून ते समाज त्यांच्याकडे भावनिक दृष्टीने बघत असतो. त्यामुळे त्यांच्या भावनांचा कोंडमारा होतो. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती वेगळे वाटू लागतात मात्र तसं नाही तर त्यांना सपोर्ट करण्याची गरजचे असल्याचे मत आनंद स्वामी शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव सुनील आरमाळ यांनी बोलताना सांगितले

दि.२२/१२/२०२२ रोज गुरूवार : आज दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोज गुरूवारला समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा व आनंदस्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही व्दारा संचालित संत ज्ञानेश्वर निवासी अपंग व मुकबधिर विद्यालय देऊळगाव मही तसेच सर्व दिव्यांग शाळा बुलढाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक सत्र २०२२-२३ च्या जिल्हास्तरीय शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रिडा स्पर्धा हया मौजे देऊळगाव मही येथे आनंदस्वामी शिक्षण प्रसारक संस्था देऊळगाव मही व्दारा संचालित संत ज्ञानेश्वर निवासी अपंग व मुकबधिर विद्यालय देऊळगाव मही च्या प्रांगणात उत्साहपूर्वक आनंदमयी वातावरणात संपन्न झाल्या. सर्वप्रथम उद्घाटनाचा कार्यक्रम डॉ. हेलन केलर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकररावजी आरमाळ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आनंदस्वामी शिक्षण प्रसारक संस्था दे. मही च्या अध्यक्षा श्रीमती शिलाताई आरमाळ हया होत्या. क्रिडास्पर्धेचे उद्घाटन जिल्हा समाज अधिकारी, जि. प. बुलढाणा मा. श्री. मनोज मेरत साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्रप्रमुख श्री. डि. एम. बुरकूल सर, दे. मही चे सरपंच मा. श्री नितीन नाना शिंगणे, संस्था सचिव श्री. सुनिल आरमाळ, समाज कल्याण विभाग जि.प. बुलढाणा च्या वैद्यकिय सामाजिक कार्यकर्त्या मा. माधुरी भागवत, सहाय्यक सल्लागार श्री. एस. एम. पुंड, तथा पत्रकार बांधव, जिल्हयातील सर्व दिव्यांग शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ६५० दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते. पैकी १८० विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री झनक सर व सुत्रसंचालन मोरे सर यांनी केले. क्रिडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप हे स्पर्धेचे उद्घाटक श्री. मा. मनोज मेरत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभाग जि.प. बुलढाणा चे श्री. एस. एम. पुंड, मा. माधुरी भागवत, मुख्याध्यापक अनिल आरमाळ, श्री. झनक सर, कुलकर्णी मॅडम, तथा सर्व कर्मचारी वृंद दिव्यांग शाळा बुलढाणा जिल्हा यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने होवून कार्यक्रम शांततापूर्वक पार पडला.