Home यवतमाळ दारव्हा तालुक्यातील नागरिकांसाठी आज भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन – पालकमंत्री संजय राठोड...

दारव्हा तालुक्यातील नागरिकांसाठी आज भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन – पालकमंत्री संजय राठोड याचा पुढाकार

244

सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे केले आवाहन

यवतमाळ – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून दारव्हा येथे आज भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. दारव्हा येथील एडेड हायस्कूल च्या प्रांगणात सकाळीं 9 वाजता या शिबिराची सुरुवात होणार आहे.
दत्ता मेघे आयर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मध्ये तसेच मा.आरोग्य सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर होत आहे.
या शिबिरात हृदयरोग, रक्तदाब,किडनीशी संबंधित जुने व अन्य आजार,हायड्रोसिल,हर्निया,आतड्याचे आजार,मुतखड्याचे आजार,पोटाचे आजार,थायरॉईड,स्तनाचा कर्करोग,मासिक पाळीचे आजार, पांढरे पाणी जाणे,महिलांचे अन्य आजार,संधीवात व मणके आणि त्यासंबंधित असणारे फॅक्चर,हाडांचे सर्व आजार, त्वचेशी संबंधित व लहान मुलांचे जसे की हृदयाला छिद्र,मतिमंद मुलांच्या विकासासंबंधीचे आणि कुपोषण,कान-नाक-घश्याचे सर्व आजार,दमा,तोंडावाटे पडणारे रक्त,विविध मानसिक व मेंदूसंबधीत विविध आजार,दंत व मुखरोग या आजारांवर निदान, उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरातील उपचारार्थीना उपचारादरम्यान मोफत औषधांचे देखील वाटप करण्यात येईल.

रुग्णांची नोंदणी ही शिबीर स्थळावर होणार असून शिबिरस्थळी तज्ञ डॉक्टर्सकडून निशुल्क तपासणी करण्यात येवून भरती झालेल्या रुग्णांच्या सर्व चाचण्या देखील मोफत करण्यात येतील.जसे की हृदयरोगबाबत ईसीजी, टीएमटी व इको मशीनद्वारे केली जाईल.
दारव्हा तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.