
खतांसाठी शेतकरी फिरताहेत दारोदारी ,
खतांची काळा बाजारी करणाऱ्या कृषी केंद्रावर कार्यवाही करण्याची मांगणी ,

अमीन शाह
साखरखेर्डा येथे गेल्या दोन दिवसा पूर्वी तालुका कृषी अधिकारी यांनी काही कृषी केंद्रांना भेट दिली व चहा पिली व ते निघून गेले मात्र खतांसाठी व बी बियाणं साठी शेतकऱ्यांची भटकंती अद्याप ही सुरू आहे
गेल्या दोन दिवसां पूर्वी खतांची व बियाणांची होत असलेली काळा बाजारी च्या अनुषंगाने तालुक्याचे कृषी अधिकारी व काही कर्मचारी कृषी केंद्र तपासणी साठी साखरखेर्डा येथे आले होते त्या नंतर सर्व सुरुळीत होऊन आपल्याला खत बी मिळेल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र साहेब आले अन , चहा पिऊन गेले व आम्हाला वाऱ्यावर सोळले अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी वायक्त केली आहे आज ही परिसरातील शेतकऱ्यांना खतासाठी दारोदार भटकंती करावी लागत आहे ऐकी कडे पेरणी साठी अनुकूल पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे तर दुसरी कडे मात्र पेरणी साठी खत मिळत नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झालं आहे , इतर मतदार संघात आमदार शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहे त्यांना खत मिळून देत आहे तर आमचे सिंदखेडराजा मतदार संघाचे कर्तवयदक्ष आमदार शेतकऱ्यांसाठी व त्यांना येणाऱ्या अडचणी साठी एक शब्द सुद्धा बोलत नसल्या मूळे शेतकरी बांधवात आश्चर्य वयक्त केलं जातं आहे , साखरखेर्डा शहराला लागून जवळपास 52 खेडे असून पेरणी जवळ आली असतांना शेतकऱ्यांना डी ऐ पी व इतर खत मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे , जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना खत बी उपलब्ध करून दयावा व खत बियाणांची काळा बाजारी करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मंगणी साखर खेर्डा परिसरातली शेतकऱ्यांनी केली आहे ,











































