Home बुलडाणा मेहकर च्या त्या पीडित महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मेहकर च्या त्या पीडित महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

557

 

अमीन शाह ,

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील अश्लील व्हिडिओ प्रकरणातील पीडित महिलेने आज , २० जून रोजी संध्याकाळी साडे चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला . मात्र कर्तव्यदक्ष महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांनी वेळीच महिलेला ताब्यात घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न फसला . घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे . मेहकर येथील माजी स्वीकृत नगरसेवक विकास जोशी यांनी पीडित महिलेवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता . याप्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात विकास जोशी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नसल्याने संतप्त पीडित महिलेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून २० जून रोजी महाराष्ट्रात कुठेही आत्महत्या करेल असा इशारा दिला होता . त्यामुळे आज सकाळपासूनच पोलिस यंत्रणा महिलेचा शोध घेत होती . पीडित महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑटोमध्ये येताच मपोना . उज्वला वारंगणे , अनिता वारंगणे , सविता गवई , सुनीता मुळे , मयुरी काकडे या महिला पोलिसांनी ऑटो मध्ये झडप घालून पीडित महिलेच्या हातातील विषारी औषधेची बाटली हिसकावून ताब्यात घेतले . यावेळी पोहेका पंजाबराव साखरे , पोहेका रवींद्र डुकरे , पो . का . उमेश घुबे , पो . का करीम शाह ( पो . स्टे . मेहकर ) पो . ना . अंकुश राजपूत जी . वि . शा . यांनी देखील यावेळी उत्कृष्टपणे कामगिरी बजावली . दरम्यान यावेळी त्याच ऑटोला घेऊन महिलेला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे . महिलेची प्रकृती स्थिर आहे