Home यवतमाळ सर्पमित्र आकाश पसले यांनी दिले नागास जीवनदान

सर्पमित्र आकाश पसले यांनी दिले नागास जीवनदान

166

 

यवतमाळ :- साप म्हटले की सर्वांची घाबरघुंडी उडत असते, अशी घटना दिनांक 17 जून रोजी लोहारा येथील गोकुळ कॉलनीतील विनोद चिरडे यांच्या घरातील कंपाउंड मधील झाडामध्ये सकाळी 8.30 ला 5 फुटाचा विषारी नाग येऊन बसला त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरले अशातच कोब्रा ग्रुपवरचे सर्पमित्र आकाश पसले यांना मोबाईलवर माहिती दिली असता त्यानीं तात्काळ घटनास्तळ गाठून मोठया शीतापीने सापास पकडले. त्यामुळे नागरिकानी सुटकेचा निश्वास घेतला.त्यानंतर सर्पमित्र यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले की, सदर साप गवाळा विषारी नाग असून आता पावसाळी वातावरण निर्माण झाले असल्यामुळे त्याच्या बिळात पाणी घेल्यावर तें आश्रय घेण्यासाठी नागरी वस्तीकडे धाव घेत असतात त्यामुळे पावसाळ्यात अशा सापा पासून सावधान राहण्याच्या सूचना दिऊन असे साप आढळून आल्यास सर्पमित्र यांना संपर्क साधून अशा वन्यप्राण्याचे जीवन वाचवण्याचे आव्हान त्यानीं यावेळी केले….