Home विदर्भ धामोरी बस स्टॉप येथील धक्कादायक घटना ,पंक्चर दुकानात शिरली भरधाव कार

धामोरी बस स्टॉप येथील धक्कादायक घटना ,पंक्चर दुकानात शिरली भरधाव कार

258

 

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

भातकुली-:अमरावती – दर्यापूर मार्गावर धामोरी स्टॉप जवळ भरधाव वेगाने येणारी कार पंक्चर दुकानात घुसल्याची धक्कादायक घटना शुक्रवार सायंकाळ ला उघडकीस आली.ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली.या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले, व दोन दुचाकीचा चुराडा झाला.

जखमी व्यक्तीचे नाव नम्रता गादे,( वय २१ मलकापूर)ती दुचाकीने बसस्टॉप कडे जात होती. रस्ता ओलाडत असताना भरधाव कार (एम.एच. ३०ए ए ३४३४) ने तिला धडक दिली,याशिवाय पंक्चर दुकान मालक रियाज पटेल (वय ३५ धमोरी )हे सुद्धा गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले .कार अमरावती वरून दर्यापूर कडे जात होती कार चालकाने नियंत्रण सुटल्याने कार रस्त्या लगतच्या पंक्चर दुकानात घुसली .घटनेची माहिती मिळताच खोलापुर पोलिस दखल झाली