Home बुलडाणा लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून स्वतःला जाळून केली आत्महत्या,

लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून स्वतःला जाळून केली आत्महत्या,

769

 

अमीन शाह

बुलडाणा ,

खामगांव तालुक्यातील पळशी खुर्द येथील २७ वर्षीय युवकाने लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून स्वतःला जाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत खामगाव ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळशी खुर्द येथील रहिवासी महेंद्र नामदेव बेलसरे वय २७ वर्ष या युवकाचे लग्न जुळत नसल्याच्या कारणावरून नैराश्यातून त्याने पळशी खुर्द येथे बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास स्वतःला जाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव येथील गणेश नगरमध्ये राहणारे धनंजय गोविंदा शेंडे वय ४३ वर्षे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरुवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता तक्रार दिली असून पोलिसांनी कलम १७४ सीआरपीसी नुसार मर्ग दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश जाधव हे करीत आहेत.