Home यवतमाळ जातीय सलोखा व शांतता ठेवण्याचे आवाहन – पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ

जातीय सलोखा व शांतता ठेवण्याचे आवाहन – पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ

559

 

⚫ घाटंजी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक.

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी – आगामी सण, उत्सव, हाेळी, धुळीवंदन, शिवजयंती, गुड फ्रायडे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढीपाडवा, महाशिवरात्री, रामनवमी, महावीर जयंती, रमजान ईद व ईतर सण येणार आहे. त्यामुळे घाटंजी व वडगांव जंगल पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातीय सलोखा व शातंता प्रस्थापित करावे, असे प्रतिपादन यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. घाटंजी पोलीस ठाणे व वडगांव जंगल पोलीस स्टेशनच्या आयोजित शातंता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष दिवटे, वडगांव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवन राठोड आदीं उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ पुढे म्हणाले की, येणाऱ्या सण व उत्सव काळात काेराेना संक्रमण वाढू नये याची प्रत्येकाने विशेष काळजी घ्यावी. सर्व सण व उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे. घराबाहेर पडतांना मास्कचा नियमित वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, गर्दी करू नये अन्य सूचना त्यांनी यावेळी केल्या.
शातंता समितीच्या बैठकीला घाटंजीचे तहसीलदार पुजा माटोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर, वन परिक्षेत्र अधिकारी रंजित जाधव, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अभियंता माणिक नगराळे, श्री. धांदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नयना ठाकुर, पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे, पोलिस उप निरीक्षक विलास सिडाम, गोपनिय शाखेचे पोलीस काँन्टेबल वामन जाधव, पत्रकार, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आदीं मान्यवर उपस्थित होते.

शातंता समितीच्या बैठकीचे सविस्तर प्रास्ताविक पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले. या वेळी घाटंजी अंजुमन इस्लाम कमेटी, जामा मस्जीद ट्रस्ट कमेटीतर्फे फारुक मुसानी, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रुपेश सावरकर (वडगांव जंगल) आदींचे समयोचित भाषने झाली. कार्यक्रमाचे संचालन राजेश उदार (सर) यांनी केले. तर आभार घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक मनिष दिवटे यांनी मानले.