Home बुलडाणा समाज जोडो अभियान रथयात्रेचे बुलडाणा जिल्ह्यात स्वागत 

समाज जोडो अभियान रथयात्रेचे बुलडाणा जिल्ह्यात स्वागत 

526

 

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा बुलडाणा कडून आयोजन

 

 

  • देऊळगावराजा : रविंद्र जाधव 

संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेतर्फे काढण्यात आलेले समाज जोडो अभियान आगामी १ जानेवरी शनिवार रोजी मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. ओबीसी, आरक्षणासंदर्भात समाजात जागृती निर्माण करण्यासाठी एका रथयात्रेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सध्या स्थितीत कोरोनाच्या शासनाकडून नविन नियमावली जाहिर करण्यात आली त्या अनुषंगाने ही रथ यात्रा देऊळगावराजा येथे स्थगती देण्यात आली. हि यात्रा जानेफळ, मेहकर, सुलतानपूर, किनगावराजा, सिंदखेडराजा, आणि देऊळगावराजात महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमाताई राऊत यांनी रथ यात्रेचे नियोजन केले होते.  

      या अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस ह्यांचे हस्ते ८ डिसेंबरला सुदूंबरे  येथून करण्यात आला. संपूर्ण राज्यातील विविध भागात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत मिळाला. या रथयात्रेत कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजूनाना शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डिले व प्रमुख पदाधिकारी पूर्णवेळ सोबत होते. तसेच विदभार्तील काही जिल्ह्यात अध्यक्ष खासदार रामदास तडस सहभागी णाले होते. त्यांच्यासोबत विदभार्तील ज्येष्ठ पदाधिकारी व प्रमुख समाज बांधवही उपस्थित राहतील. दरम्यान विदर्भात या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. या रथयात्रेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे विभागीय सचिव राजेंद्र हजारे यांनी केले होते. परंतु अचानक राज्यात कोरोनाचा उदे्रक वाढल्याने शासनाने जमाव बंदी आणि ५० लोकांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी निर्बंध लावले. शासनाच्या दिलेल्या नियमांची अमलबजावनी करण्यासाठी ही राथ यात्रा मोजक्या समाज बांधवाच्या दर्शनाचा लाभ घेण्यात आले. ही रथयात्रा बुलडाणा जिल्ह्यात १ जानेवरी रोजी दाखल झाली जानेफळ, मेहकर, सुलतानपूर, किनगावराजा, सिंदखेडराजा शेवट सांयकाळी देऊळगावराजा येथे स्थगती देण्यात आली. रथयात्रेचे बुलडाणा जिल्ह्यात नियोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमाताई राऊत यांनी केले होते. 

       दे.राजात रथयात्रेचे स्वागत

     सायकाळी रथयात्र शहरात दाखल होताच आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात रथयात्रा तेली समाज मंदीरात आगमन झाले. कोरोनाच्या नियमात भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतल