Home विदर्भ सावळी सदोबा येथील आरोग्य शिबिरात एक हजाराच्या वर रुग्णांनी तपासणी..!

सावळी सदोबा येथील आरोग्य शिबिरात एक हजाराच्या वर रुग्णांनी तपासणी..!

297

➡️ यवतमाळच्या नामवंत व तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती, तपासणी शिबीरात तपासणी व औषधोपचार मोफत..?

(अयनुद्दीन सोलंकी)

घाटंजी / यवतमाळ – आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे शहीद ज्ञानेश्वर आडे बहुउद्देशीय संस्था, कृष्णनगर यांच्या वतीने रविवारी सावळी सदोबा येथे भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सावळी सदोबा व परिसरातील एक हजाराच्या वर रुग्णांनी हजेरी लावली होती. यवतमाळच्या नामवंत व तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी केली. आयोजकांकडून रुग्णांच्या तपासणी सोबतच मोफत औषधोपचार आदीं देण्यात आले होते, हे विशेष.
सावळी सदोबा येथील तंवर कॉंम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात यवतमाळचे प्रसिद्ध दातांचे डॉ. प्रशांत तामगाडगे, आर्थोपेडिक सर्जन डॉ. वरून डहाके, जनरल सर्जन डॉ. अजोनिश कांबळे, जनरल फिजीशियन डॉ. अच्युत नरूटे व डॉ. सुमेध गुर्दे यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांचेवर उपचार केले.
सावळी सदोबा विभागात अशा प्रकारचे उपचार कधीही करण्यात आले नाही, असे काही रुग्णांनी या वेळी सांगितले. विशेषतः रोगनिदान शिबिरात तपासणी व औषधोपचार संपूर्णपणे मोफत देण्याची ही पहिलीच वेळ होती, असे समजते.
या आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांची रक्त व शुगर तपासणी करण्यात आली. या शिबिरात मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टसिंग या कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली होती, हे विशेष. या शिबिराला पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी भेट देऊन स्वतः सदर शिबीरात तपासणी करून घेतली. या शिबिरात तपासणी करून औषधोपचार घेतलेल्या रुग्णांनी शिबिराचे आयोजक वीरपत्नी कुंतीताई आडे, नुनेश्वर आडे व मुबारक तंवर यांचे मनापासून आभार मानले आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी किसन चव्हाण, जितेश पवार, ईंद्रसिंग चव्हाण, विजय राठोड, सनम तवर, उमाकांत आडे, राज चव्हाण, अमोल जाधव, संदेश तोव्हर, विरू राठोड, चेतन चव्हाण, नानु राठोड, लखन राठोड, टिनु चव्हाण, संतोष पवार, अमित जाधव, ऊल्हास जाधव, डोमा चव्हाण, माॅंटी जाधव, सत्पुरुष चव्हाण, मनमोहन जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले.