Home महत्वाची बातमी मुंबईतील पहिली ते आठवी पर्यंत च्या सर्व शाळा बंद ,

मुंबईतील पहिली ते आठवी पर्यंत च्या सर्व शाळा बंद ,

219
0

 

राज्यातील शाळाबाबत ही लवकरच निर्णय ,

पोलीसवाला न्युज नेटवर्क ,

वाढता करोना चा धोका पाहता आज पासून मुबंई तील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यभरातील शाळांबाबतचा निर्णय ही आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्यापूर्वी मुंबई महापालिकेने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . महापालिका अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत . विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे . मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे . कारण मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे
त्यामुळे आता मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे . कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईतील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . राज्यभरातील शाळांबाबतचा निर्णय देखील आज होण्याची शक्यता आहे . कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे १५ डिसेंबरपासून पहिली ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या . पण मुंबईत सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे . राज्यात सर्वाधिक कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत . या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तातडीची बैठक बोलावली आहे या बैठकीत राज्या बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे