Home साहित्य जगत चवदार तळे…!

चवदार तळे…!

851
स्पृश्यास्पृश्य  भेद
मानत  होते  खुळे
प्रस्थापीत जाळ्यां
फसत  होते भोळे
आंदोलन  बाबांचे
महाडचवदार तळे
पाणी सर्वां समान 
रहस्य खरेचं  कळे
असह्य तो अन्याय
साहेब ही तळमळे
साखळीमुक्त  सारे 
झाले  डाॅक्टरांमुळे
तेव्हा लावले रोपटे
आतामिळती फळे
सोसल्या त्याझळा
फुलले  सुंदर  मळे
प्रकाश खुले सर्वत्र 
दिवस सरले काळे
धन्य रे महामानवा
हातआपसूक जुळे
महूस्थान चैत्यभूमी
रक्तधमन्या सळाळे
तुझा विचार  सुगंध
आसमंतात दळाळे
– हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.