Home बुलडाणा रावण दहन कराल तर ॲट्रॉसिटी दाखल करू : विजयकांत गवई .

रावण दहन कराल तर ॲट्रॉसिटी दाखल करू : विजयकांत गवई .

597

महात्मा रावण बहुजनांचा आदर्श :
रिपब्लिकन सेनेतर्फे अभिवादन सभेचे आयोजन

समीर शेख 
चिखली :
बहुजन नायक तथा आदर्श व्यक्तिमत्व महात्मा रावण यांचे चारित्र्य चुकीच्या पध्दतीने प्रतिपादन करून त्यांच्या प्रतिमांचे दसर्‍याच्या दिवशी दहन करण्याची चुकीचे प्रधा या पुढे थांबवण्यात यावी अन्यथा महात्मा रावण दहन कार्यक्रम करणार्‍या संबधीतांवर अॅट्रोसिटी गुन्हे दाखल करु ,असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदन देते वेळी जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांच्या सह शेख सलिम,काॅम्रेड सत्य कुटे, ब्रह्माभाउ साळवे, सुरेश इंगळे, सुनिल सोळंके, सतिष पवार, सतिष इंगळे, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महात्मा रावण हे महा पराक्रमी राजा होते. तामिळनाडू राज्यात 352 मंदिरे असून मध्य प्रदेशात 15 मिटर उंचीची मुर्ती आहे. महात्मा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीचा वैभवशाली अविस्मरणीय ठेवा असुन विविध गुणांचा समुच्चय आहे. महान दार्शनिक संगीततज्ञ होता.हे विशेष!
महत्वाची बाब म्हणजे यावर्षी पासुन रिपब्लिकन सेनेच्या वतीने दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी महात्मा रावण यांचा अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. चिखली शहरातील जयस्तंभ चौक या ठिकाणी दि.15 आक्टोबर 2021 दसर्‍याच्या दिवशी सकाळी 11 वाजता अभिवादन सभा आयोजीत करण्यात आली आहे. कोविड 19 च्या नियमांचे पालन करून सदर सभा होणार असून सभेस बहुजन समाजातील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.