Home विदर्भ लोकायत मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर भगत व प्राचार्य दिलीप मोहुर्ले...

लोकायत मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर भगत व प्राचार्य दिलीप मोहुर्ले यांचे विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..!

373

🔵 शिक्षिकेचा खोटा व बनावट राजीनामा सादर केल्याचा आरोप….!

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी शहरातील घाटी येथील शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिलीप मोहुर्ले व लोकायत मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव किशोर भगत यांनी शिक्षिका संगीता येणोरकर हीचा खोटा व बनावट राजीनामा तयार केल्या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संस्थेचे सचिव किशोर भगत व ईतरांनी या पुर्वी बनावट कागदपत्रे तयार करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून बेरोजगांरासाठी असलेल्या योजनेतून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी यवतमाळच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी किशोर भगत, राखी भगत व गजानन मोडक विरुद्ध भादंवि कलम 420, 467, 468, 471 सह कलम 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर प्रकरण घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. पुढील चौकशी जमादार राहुल खंडागळे हे करीत आहे. घाटंजी घाटी येथील शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालयात कनिष्ठ शिक्षिका म्हणून संगीता येणोरकर ह्या सन 2014 च्या पुर्वी पासुन विद्यालयात कार्यरत होत्या. त्यातच त्यांचा 30 एप्रिल 2018 रोजी विवाह झाल्याने त्या पती कडे नागपूरला रहावयास गेल्या. त्या दरम्यान संगीता हिला प्रसुतीचा त्रास होत असल्याने त्यांना बेडरेस्ट ची आवश्यकता असल्याचा सल्ला डाँक्टरांनी दिला. ती प्रसुती रजेवर असतांना शिक्षिका संगीता येणोरकर ह्या महाविद्यालयात रुजु होण्यास गेली असता, तेथील प्राचार्य दिलीप मोहुर्ले यांनी टाळाटाळ करुन रुजु करुन घेतले नाही. अखेर संस्थेचे सचिव किशोर भगत यांची भेट घेऊन महाविद्यालयात रुजु करुन घेण्याची विनंती केली असता त्यांनी सांगितले की, “तुम्हाला सेवेतून कमी केले आहे.” असे सांगीतल्याने तीला धक्काच बसला. त्यानंतर शिक्षिका येणोरकर ह्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यवतमाळ व शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या कडे संस्थे विरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, शिक्षिका येणोरकर हिने राजीनामा दिलेला नसतांना सचिव किशोर भगत व प्राचार्य दिलीप मोहुर्ले यांनी हलबले नावाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती कार्यालयात वैयक्तिक मान्यता प्रस्ताव सादर केला. या वरुन शिक्षिका संगीता येणोरकर हीची खोटी व बनावट सही करून खोटा राजीनामा सादर केल्या प्रकरणी घाटी येथील महाविद्यालयात रुजु करुन घेण्यासाठी अमरावती येथील न्यायाधिकरण न्यायालयात सदरचे प्रकरण सुरु असून प्रलंबित असल्याची माहिती, शिक्षिका संगीता येणोरकर हिने दै. पुण्यनगरीला दिली आहे.

=============== शिक्षिका संगीता येणोरकर हिची प्रतिक्रिया घेतली असता, आपणाला रुजु करुन घेण्या बाबत आपण अमरावतीच्या न्यायाधिकरण न्यायालयात संस्थेचे सचिव किशोर भगत व प्राचार्य दिलीप मोहुर्ले यांचे विरुद्ध प्रकरण दाखल केले आहे. तसेच महाविद्यालयात लागण्यासाठी रोख पांच लाख रुपये दोन टप्प्यात दिलेले असून आणखी पैशाची मागणी करत आहे. मी कोणताही राजीनामा दिलेला नसुन तो पूर्णतः खोटा व बनावट रित्या तयार केलेला असून प्रसुती दरम्यान 1 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 2018 पर्यंत मी पुर्णता बेडरेस्ट वर होते. या वेळी मी नागपूरला होती. त्यामुळे मी घाटंजी घाटी येथे आलीच नाही. त्या बाबतचे माझे कडे डाँक्टरचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

==================घाटंजी पोलीस स्टेशनचे चौकशी अधिकारी तथा जमादार राहुल खंडागळे यांची प्रतिक्रिया घेतली असता, शिक्षिका संगीता येणोरकर हिची तक्रार घाटंजी पोलीस ठाण्यात रजिष्टर पोष्टाने प्राप्त झाली असून गैरअर्जदार सचिव कीशोर भगत, प्राचार्य दिलीप मोहुर्ले यांचे बयाण नोंदविलेले असुन त्यांचे कडुन मस्टर व ईतर कागदपत्रे ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरण शिक्षण विभागांशी सबंधित असल्याने त्यांना न्यायालयात दाद मागण्यासाठी सुचनापत्र दिले आहे. सदर प्रकरणातील फिर्यादी संगीता येणोरकर हिचे बयाण नोंदविणे बाकी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.