Home बुलडाणा चिखली शहरात दोन दिवसात चोरट्यांनी केले लाखो लंपास

चिखली शहरात दोन दिवसात चोरट्यांनी केले लाखो लंपास

1097

 

चोरीचा थरार cctv कॅमेरात कैद ,

 

अमीन शाह ,

चिखली शहरात चोरटयांचा सुळसुळाट झाला असून चोरट्यांनी दोन दिवसात गजबजलेल्या डी , पी , रोड वरून गाड्यांच्या डीक्कीतुन 5 लाख 25 हजार रुपये लंपास केले असल्याची घटना घडली आहेत , चोरी करतांना चोरटे सी , सी ,टीव्ही कँमेरात कैद झाले असून अद्याप पोलीस या चोरट्यांना पकडू शकले नाहीत , या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार

रस्त्यावर स्‍कूटी उभी करून जिलेबी खाण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या स्‍कुटीची डिक्की फोडून भामट्याने ७५ हजार रुपये लंपास केले. चिखली शहरातील वर्दळीच्या डीपी रोडवर १६ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. काल, १७ सप्टेंबर रोजी शेतकऱ्याने चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली.

आन्वी (ता. चिखली) येथील शेतकरी वासुदेव दौलतराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बँकेचे कर्ज भरण्यासाठी ते चिखलीत आले होते. स्टेट बँकेतून ५० हजार व चिखली अर्बन बँकेतून काढलेले २५ हजार असे ७५ हजार रुपये त्यांनी स्कुटीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर चिखली येथील डी पी , रोड वरील लक्ष्मी मार्केट येथे हरियाणा जलेबी सेंटरवर जिलेबी खाण्यासाठी ते गेले.
स्‍कुटी लक्ष्मी मार्केट येथील नागवाणी चार्टेड अकाउंटंट यांच्या कार्यालयासमोर उभी केली. थोड्या वेळात ते जिलेबी खाऊन परत आले व स्कुटी घेऊन कर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र बँकेत गेले. तिथे गेल्यावर त्यांनी डिक्की उघडून बघितली असता डिक्कीत त्यांना पैसे दिसले नाहीत. चोरट्याने डिक्कीचे लॉक तोडून ७५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार पवार यांनी दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

साडे चार लाख लंपास ,

स्‍कूटीच्या डिक्‍कीतून साडेचार लाख रुपये चोरट्याने लांबवल्याची घटना चिखलीत १८ सप्‍टेंबरला समोर आली आहे. या प्रकरणी सावरगाव डुकरे (ता. चिखली) येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी अशोक लामखेडे यांनी चिखली पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. शहरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांच्‍या कारवायांना आळा घालण्याची मागणी नागरिक करत आहेत.
लामखेडे (६२) हे १८ सप्‍टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास सावरगाव डुकरे येथून चिखलीतील भारतीय स्‍टेट बँक शाखेत आले होते. या बँकेच्या खात्यातील काही रक्‍कम त्‍यांना चिखली अर्बन आणि अनुराधा अर्बन बँकेत टाकायची होती. स्‍टेट बँकेतून त्‍यांनी साडेचार लाख रुपये काढले आणि स्‍कूटीच्‍या (क्रमांक एमएच २८ एक्‍यू १२९१) डिक्‍कीत रूमालामध्ये ठेवले. तिथून ते शिवाजी शाळेजवळील शिवाजी हांडगे यांच्‍या आरओच्या दुकानावर आले. त्‍यानंतर तिथून वारे पेट्रोलपंपाजवळील रूद्रकर यांच्‍या इस्‍त्रीच्या दुकानावर आले.त्‍यानंतर पैसे भरण्याबद्दल संभ्रम झाल्याने ते तसेच सावरगाव डुकरे येथे निघून आले. घरासमोर गाडी उभी केली व पैसे घेण्यासाठी डिक्‍की उघडली असता डिक्‍कीतील साडेचार लाख रुपये गायब होते. त्‍यांनी घडलेली घटना मुलगा व पत्‍नीला सांगितली. मुलगा उमेशसह ते पुन्‍हा चिखलीला आले. जेथे जेथे गेले, तिथे चौकशी केली. पण त्‍यांनीही पैशांबद्दल काहीच माहीत नसल्याचे सांगितले. अखेर लामखेडे यांनी चिखली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

डी , पी , रोडवर पोलीसांची डीयुटी लावण्यात यावी ,

चिखली शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या डी , पी , रोडवर सोने चांदी ,कापड , कृषी केंद्र , बँका , असून खरेदी साठी ग्रामीण भागातील अनेक लोकांची येथे नेहमी वर्दळ असते दररोज लाखो रुपयांचा वयव्हार येथूनच होते गेल्या काही दिवसां पासून चोरट्यांनी याच रोडला आपले लक्ष्य बनविले असून या रोडवर पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहे ,एवढी मोठी रक्‍कम चोरी गेल्याने शहरात खळबळ उडाली असून, चोराचा शोध पोलीस घेत आहेत.