Home विदर्भ दुचाकी चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दुचाकी चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

439

इकबाल शेख – वर्धा

मोटारसायकल चोरी संबंधाने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाकडून आरोपीचा शोध सुरु असताना मुखबीरकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पो.स्टे. आष्टी अप. क्र. १५४/२०२१ कलम ३७९ भा.दं.वी. या गुन्ह्यातील आरोपीचा मध्य प्रदेश येथील बैतूल तसेच अमरावती जिल्हा परिसरात शोध घेऊन दिनांक १९/०९/२०२१ रोजी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी फुलचंद फगन उईके, वय.२४ वर्ष, रा. घागरा थाना, ता. वडाली, जि. बैतूल, रा. मध्य प्रदेश याचे कडून एक होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल कि ३०,०००/- रु चा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत साळुंखे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, नरेंद्र डहाके, प्रमोद पिसे, नितीन इटकरे, अविनाश बनसोड, नितीन मेश्राम यांनी केली.