Home बुलडाणा आठवडी बाजार बंद असतांना सिंदखेडराजा तालुक्यात बाजार भरतातच कसे???

आठवडी बाजार बंद असतांना सिंदखेडराजा तालुक्यात बाजार भरतातच कसे???

248
  1. सिंदखेडराजा , दुसरबीड , साखरखेर्डा, मलकापूर पांगरा , सेंदुर्जन येथे भरत आहेत आठवडी बाजार ,

प्रशासनाची अनदेखी ,

भगवान साळवे ,

 

सिंदखेडराजा ,

 

शासनाचे निरबंध कायम असतांना गेल्या काही आठवड्यापासून सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा , साखरखेर्डा , दुसरबीड मलकापूर पांगरा, किंगावराजा येथे मोठे आठवडी बाजार भरत असून या कडे तहसिलदार , गट विकास अधिकारी स्थानिक ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असून संबंधित प्रशासन या कडे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे ,

राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र्रासह बुलडाणा जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत त्यात होणाऱ्या गर्दी मूळे आठवडी बाजार पूर्णतः बंद करण्यात आलेले आहे असे असतांना मात्र तालुक्यात आठवडी बाजार भरत आहे बाजारात लोकांची एकच गर्दी झालेली दिसुन येत आहे बाजारात दुकानदार व ग्राहकांनी कुठल्याही मास्क चा वापर करीत नसल्याचे दिसत आहे सोशल डिस्टनसिंग नियमांचे तिनतेरा वाजल्याचे दिसुन येत आहे जिल्ह्यात नविन कोरोना रुग्णाची संख्या जरी कमी असली तरी कोरोनाचा धोका मात्र कायम असुन तो शासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा एक भाग आहे, तिसऱ्या लाटेचा धोखा ही कायम आहे अश्यातच लोकांची होणारी गर्दी टाळणे हे प्रशासनाचे काम आहे मात्र स्थानिक प्रशासन हे उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहत आहे ,

*बाजार बंद कोण करणार ,* ?

जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाला डावलून सिंदखेडराजा तालुक्यात मोठे आठवडी बाजार भरत असून लोकांची एकच गर्दी होत आहे त्या मुळे कोरोना संसर्ग वाढन्याची भीती वयक्त केली जात आहे , जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम तहसिलदार व गटविकास अधिकारी यांचे आहेत मात्र ते ही उघळया डोळ्यांनी हे सर्व बघून याकडे डोळे झाक करीत आहे तरी जिल्हा प्रशासनाने त्वरित या गंभीर बाबी कडे लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी अशी मागणी काही सुज्ञ नागरिक करीत आहे ,

*बाजार बंद मात्र बैठक वसुली सुरू ,* ?

तालुक्यातील साखरखेर्डा , मलकापूर पांगरा , सेंदुर्जन , दुसरबीड , किंगावराजा , इत्यादी ठिकाणी मोठे आठवडी बाजार भरत असून भरणाऱ्या आठवडी बाजारात पूर्वीचे बैठक वसुली ठेकेदार हे अवैध वसुली करीत असून त्यांची चौकशी होने गरजेचे आहे शासनाच्या वतीने बाजार बंद असतांना वसुली मात्र जोरात सुरू आहे असे का ??? या संदर्भात एका पंचायत समिती अधिकाऱ्याला विचारणा केली असता आम्हाला या बाबत काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले अवेध वसुली करणाऱ्या सर्व बैठक ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मंगणी व्यापाऱ्यांच्या वतीने केली जात आहे