Home नांदेड देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना करावी – अभिवक्ता संघाने...

देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना करावी – अभिवक्ता संघाने केली पालकमंत्री चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

162

नांदेड प्रतिनिधी/ राजेशNभांगे

देगलूर येथे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांनी येवून अभिवक्ता संघ व पुरोगामी अभिवक्ता संघाची भेट घेतली.
तर या भेटीत अभिवक्ता संघ व पुरोगामी अभिवक्ता संघाच्या वतीने देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
तर यावेळी अभिवक्ता संघ व पुरोगामी अभिवक्ता संघाचे जवळपास सर्वच सदस्य उपस्थित होते. तर अभिवक्ता संघ व पुरोगामी अभिवक्ता संघाच्या वतीने ऍड. विलायत अलि अभिवक्ता संघाचे अध्यक्ष म्हणून अभिवक्ता संघाच्या वतीने आपले मत मांडले.
तर देगलूर हे शहर आंध्र व कर्नाटक च्या सिमेवरील नांदेड जिल्ह्यातील एक मोठा तालुका असुन देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन होण्याची गरज असुन
हे वकिलांच्याच नाही तर जनतेच्या ही सोईसाठी गरजेचे आहे.
एखाद्या खटला चालविण्यासाठी देगलुर सोडुन बिलोली किंवा मुखेड या ठिकाणी गरज असणार नाही.
तसेच बिलोली येथील न्यायालयात ५० % पेक्षा जास्त खटले हे देगलूर तालुक्यातीलच असुन त्यामुळे प्रत्येक वेळी ये -जा करिता असतांना वेळेवर वाहने सुद्धा उपलब्ध नाहीत तर याचीच जाणीव ठेवून जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची देगलूर येथे स्थापना करण्यात यावे अशी अभिवक्ता संघाच्या व पुरोगामी अभिवक्ता संघाच्या वतीने यावेळी पालकमंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आले.

यावेळी ऍड.काझी आदि अध्यक्ष पुरोगामी अभिवक्ता संघ देगलूर, ऍड.रवी पाटील अध्यक्ष अभिवक्ता संघ देगलूर, ऍड काझी मोहसिन आली, ऍड, सुरेश देसाई, ऍड.एस.एन.सावळे, ऍड.ए.जे.लच्छनकर, ऍड.डोंगळीकर, ऍड.कांबळे, ऍड.आर.नाईक, ऍड.वि.निलमवार, ऍड.यु.जि.वाघमारे, ऍड.सुगावकर, ऍड.अ.अन्सारी, ऍड.एस.देशमुख, ऍड, संदिप, ऍड.अक्यमवार, ऍड.इनामदार, ऍड.प.अली, ऍड.बेग, व आदि आभिवक्ता सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.