Home बुलडाणा वीर जवान किशोर काळूसे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वीर जवान किशोर काळूसे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

210

 

 

सैकडो लोकांची उपस्थिती ,

 

  • बीबी येथुन
    भगवान साळवे

 

अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मूळ सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव कोळ येथील हल्ली मुक्काम लोणार तालुक्यातील बीबी येथील जवान जवान किशोर काळूसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने 4 ऑगस्टच्या दुपारी दोन वाजता वीरमरण आले अश्या या वीर जवानांवर बीबी येथील स्मशान भूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी अमर रहे अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला
वीर जवान किशोर यांच्या वीर मरण आल्याची बातमी येताच पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या विरपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी मोट्या संख्येने जनसमुदाय त्याचे राहते घर बीबी येथे जमा झाला फुलाने सजविलेल्या गाडीत जवान किशोर यांच पार्थिव त्यांच्या राहत्या घरी नेले त्यानंतर तिथून पुढे सजवलेल्या गाडीत जवान किशोर यांचे पार्थिव पार्थिव स्मशानभूमीकडे देण्यात आले यावेळी गावातील रस्ते आपल्या वीर जवानांना शेवटचा निरोप देण्यासाठी ठिकाणी रांगोळी काढून सजविण्यात आले होते यावेळी रस्त्याने जाताना दुतर्फा लोकांनी वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत होते त्यानंतर पार्थिव स्मशान भूमी देतात तेथे प्रशासनाच्यावतीने तहसीलदार नदाफ यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले करून मानवंदना दिली त्यानंतर पंचायत समिती सभापती वर्षा इंगळे गावचे प्रथम नागरिक सरपंच गुलमोहर यांच्यासह अनेकांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले त्यानंतर जवान किशोर यांचा भाऊ नूतन याने मुखाग्नी दिला यावेळी अनेकांच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिल. जवान किशोर काळूसे हे वयाच्या 19 व्या वर्षी 2009 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सिलिगुडी व पंजाब मधील जालंदर येथे देश सेवा केली त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये त्यांची बदली झाली. दिनांक 4 ऑगस्ट रोजी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जवान किशोर काळुसे हे नायब सुभेदार पदावर होते. त्यांच्या पश्चात मुलगी पत्नी, आई, एक भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आ हे वीर जवान किशोर यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील लोक विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार माजी सैनिक उपस्थित होते