
प्रतिनिधी [रवि आण्णा जाधव]
देऊळगाव राजा:-निराधार वृद्ध बाबा तीन दिवसांपुर्वी गणेश शिंगणे यांच्या दुकाना समोर मंडपगाव रोडवर भर पावसात भिजत होतें त्यांना चालता येत नव्हते गणेश शिंगणे व मधुकर शिंगणे व काही मित्रांनी त्यांना उचलून त्यांच्या दुकान समोर आणले, आणि त्यांनी व काही मित्रांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली.

आज आपण माणुस म्हणुन समाजात जीवन जगत असतांना आपल्याला समाजाचे काही देणं लागत या भावनेने गणेश शिंगणे श्री अशोक काकडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला उपचारासाठी आम्ही आमच्या दिव्या फाऊंडेशन संस्थेमध्ये घेऊन जातो असे सांगितले,
जीवन जगण्याचे सामर्थ्य या पेक्षा दुसर काय असाव अश्या बेघर,निराधार व्यक्तींसाठी आधार होणे.मित्रानो तुमच्या परिसरात जर अशे गरजु लोकं ज्यांना खरच कोणी नाही आशा व्यक्तींना मदत करा.आज देऊळगाव महीमद्ये त्या रुग्णाला दिव्या फाऊंडेशन च्या स्वाधीन करताना गणेश शिंगणे, मधुकर शिंगणे, मा. सरपंच प्रदीप हिवाळे,गजानन दहातोंडे, दिव्या फाऊंडेशनचे आद्यक्ष अशोक काकडे व त्यांचे कर्मचारी व देऊळगाव मही येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते,असे लोक असेल तर दिव्या फाऊंडेशन अशोक काकडे मोबाईल:-9260008002 वरवंड यांना कळवा.











































