Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट

कुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट

500

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ते भादली मार्गावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात वाहनधारकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे.या मार्गावर वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.खड्ड्यांमुळे तसेच निसरडा रस्ता बनल्याने वाहने स्लिप होवून पडत आहेत.या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे दिसून येत आहे यामुळे वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे.

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांकडे जाणारा कुंभार पिंपळगाव ते भादली हा १५ किलोमीटर अंतराचा रस्ता खुपच खराब झाला आहे. या रस्त्याने राजुरकर कोठा ,नाथनगर, भादली, शिवनगाव या गावचे ग्रामस्थ ये- जा करतात .सध्यस्थितीत या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवणे एक आव्हान बनु पहात आहे. उन्हाळ्यात ऊसाची वाहतुक सुकर व्हावी म्हणुन साखर कारखानदारांनी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करून खड्डे बुजविण्यात आले, माञ परिसरात पाऊस पडल्याने संपुर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे रस्त्याला अक्षरश: पाणंद रस्त्याचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर अनेक दुचाकी घसरून अपघात होत आहेत. या रस्त्यावरून दुचाकी चालवणे मोठे जिकिरीचे झाले आहे दरम्यान, या रस्त्याचे काम त्वरित   दुरूस्त करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक राजेश तौर, गोरख तौर, माऊली तौर, शरद तौर, बाळु तौर ,बाळासाहेब बहिर, चंद्रकांत बहिर, सखाराम  दुबाले, भैया बहिर , किशोर पोकळे ,वच्छिष्ट  बहिर ,बाळु शिंदे, विठ्ठल ढिसले, गणेश पवार, अरूण बहिर ,नारायण बहिर, सुदाम खोले ,सोमनाथ सोनसाळे यांनी केली आहे.