
सर्वत्र अभिनंदन ,
मंगेश तिडके
देऊळगाव राजा:- तालुक्यातील पिंप्री आंधळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पत्रकार अर्जुन आंधळे यांच्या पत्नी अंजली अर्जुन आंधळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली, तर उपसरपंच पदी सिद्धेश्वर डोईफोडे विजयी झाले नऊ सदस्य संख्या असलेल्या पिंप्री ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीच्या प्रारंभी अविरोध निवडीचे प्रयत्न झाले होते, सरपंच पदासाठी सौ अंजली अर्जुन आंधळे यांच्या नावावर सर्व ग्रामस्थांनी संमती दिल्याने फक्त उर्वरित सदस्य निवडणे बाकी होते मात्र काही वार्डात सदस्यांच्या नावावर सहमती होत नसल्याने व रिंगणातून माघार घेण्यास इच्छुकांनी नकार दर्शविल्याने अखेर निवडणूकी शिवाय पर्याय उरला नव्हता, दोन्ही गट आमनेसामने उभे ठाकले,उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, यात वार्ड क्रमांक एक मधुन सौ अंजली अर्जुन आंधळे यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्या अगोदरच अविरोध निवडून आल्या होत्या, उर्वरित सात जागांसाठी पंधरा उमेदवार रिंगणात होते, निकाल जाहीर झाल्यानंतर वार्ड क्रमांक एक मध्ये सौ अंजली अर्जुन आंधळे अविरोध, मनिषा राजु गुमलाडू, चंद्रभागा कचरूबा आंधळे, वार्ड क्रमांक दोन मध्ये सिद्धेश्वर रामकिसन डोईफोडे, मनिषा राजु गुमलाडू असे पाच उमेदवार विजयी झाले होते, मतदारांनी स्पष्ट कौल देत नऊ पैकी पाच जिंकल्याने पिंप्री आंधळे ग्रामपंचायत मध्ये सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता,गुरूवारला सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली, सरपंचपदासाठी अंजली अर्जुन आंधळे तर उपसरपंच पदासाठी सिद्धेश्वर रामकिसन डोईफोडे यांचे उमेदवारी अर्ज निर्धारित वेळेत दाखल झाले, विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक अध्यासी अधिकारी यांनी सरपंचपदी अंजली अर्जुन आंधळे तर उपसरपंचपदी सिद्धेश्वर डोईफोडे अविरोध विजयी झाल्याचे जाहीर करताच समर्थकांनी जल्लोष केला,यावेळी ग्रामपंचायत समोरच्या मैदानात महिला पुरुष व युवक वर्गाची उपस्थिती होती.











































