Home जळगाव रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षात मुस्लिम समाजाच्या तरुणांचा जाहीर प्रवेश

रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षात मुस्लिम समाजाच्या तरुणांचा जाहीर प्रवेश

284
0

रावेर( शरीफ शेख )

रावेर शहरातील मुस्लिम समाजाच्या तरुणांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात जाहीर प्रवेश केला बहुजन हृदय सम्राट मा.खा.श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये तसेच जि. अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे व जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शहरातील मुस्लिम समाजाच्या तरुणांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात जाहीर प्रवेश केला.

त्या कार्यकर्त्यांची नावे शाकिब मो.शरीफ, सलमान शहा अरमान शाह, समीर शहा शब्बीर शहा, फय्युमखा अयुबखा, इ.कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी फुलहार व वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे रुमाल गळ्यात टाकून कार्यकर्त्यांचा सत्कार केला.
रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शाह, गौतम अटकाळे, अजय तायडे ,विनोद तायडे ,शेख अब्बास शेख शब्बीर, इमरान शेख रमजान ,इरफान शेख नियाज मो ,सदाशिव निकम इ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.