Home बुलडाणा बेटी बचाओ बेटी पढाओ प्रथम पुरस्कारांसाठी कन्या शाळेची निवड

बेटी बचाओ बेटी पढाओ प्रथम पुरस्कारांसाठी कन्या शाळेची निवड

256

 

उत्कृष्ठ कामगिरी ,

अमीन शाह

बुलडाणा – मुलींच्या शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेची बेटी बचाओ बेटी पढाओ या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी एकान्वये जिल्ह्य़ातील तीन शाळांची या पुरस्कारासाठी घोषणा केली आहे.
एकात्मिक बालविकास सेवा कक्षांतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम राबविणे संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृती दल स्थापन करण्यात आले होते. या मध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या तीन प्राथमिक शाळांना विशेष अनुदान देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्य़ातील 13 शाळेंचे अहवाल गटशिक्षणाधिकारी यांचेकडून मागवण्यात आले होते. यापैकी जिल्हास्तरावरुन तीन शाळांची निवड करण्यात आली यामध्ये या शाळांना पाच हजार रुपये अनुदान देण्यात आले. त्यामध्ये साखरखेर्डा येथील कन्या शाळेचा अव्वल क्रमांक आला असून या उपक्रमास साधनव्यक्ती पदमाकर गवई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले . शाळेचे मुख्याध्यापक कैलास ढोलेकर, भानुदास लव्हाळे, ए. एस. पडघान, सुरेंद्र जैन, एच एम खान, यांचे पालकांनी अभिनंदन केले आहे.

शाळा हे विद्या मंदिर आहे शाळेच्या सुशोभीकरणासाठी आम्ही लोकवर्गणीतून शाळा सजवली असून शाळेमध्ये वृक्षराजी फुलवून मुलींना सौहार्दाचे वातावरण निर्माण केले आहे.लवकरच शाळेला आय एस ओ दर्जा मिळविण्यासाठी नोंदणी करण्यात येणार आहे.
कैलास ढोलेकर
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद कन्या शाळा साखरखेर्डा