
ईकबाल शेख
वर्धा / आंजी (मोठी) : – आंजी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात राजरोषपणे दारु, मटका, जुगार, रेती चोरी, अशा अनेक प्रकारच्या अवैध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात उधान आले असुन या राजरोषपणे सुरु असलेल्या अवैध व्यवसायाला आशिर्वाद कुणाचा? हा मोठा प्रश्न सध्या खरागना व आंजी परिसरातील जनतेसमोर उभा आहे.
आंजी परिसरात कुणालाही विचारा की मटका , जुगार, कुठे कुठे चालतो’ सर्वप्रकारची देशी-विदेशी दारु कुठे मिळते,तसेच अवैधपणे रेती, चोरी कुठुन होत आहे हे सर्व राजरोसपणे सुरू असताना याचा पत्ता त्या त्या विभागातील अधिकार्यांना नाही याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. तेव्हा नक्कीच कुठे तरी मोठ्या प्रमाणात पाणी मुरत असावे असा अंदाज नागरीकांकडुन व्यक्त केल्या जात आहे. या अवैध व्यावसायीकांना मिळत असलेल्या अभयामुळे त्यांची गावात चांगलीच दादागीरी वाढली आहे. आमचे कोणीच काहि करु शकत नाहि या अविर्भावात ते गावात वावरत आहे. तेव्हा या अवैध व्यावसायीकांवर कारवाई कधी व कोण करणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.










































