Home बुलडाणा नागोबा तलावातील अवैध पाणी उपसा होतअसल्यामुळे मच्छिमार व्यवसाय संकटात..

नागोबा तलावातील अवैध पाणी उपसा होतअसल्यामुळे मच्छिमार व्यवसाय संकटात..

200

 

कौसर शेख

मेरा खुर्द प्रतिनिधी.

चिखली तालुक्यातील भरोसा येथील नागोबा तलावातून अवैध पाणी उपसा होत असल्याने मच्छिमार हा व्यवसाय संकटात येऊन ठेपला आहे.
नागोबा च्या तलावतुन शेतीसाठी पाणी उपसा होत असल्याने जनावरांचा पाणी प्रश्न गंभीर होण्याच्या मार्गावर असल्याने पशुवैद्यकीय तसेच संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन या तलावातून पाणी होत असलेल्या पाणी उपसा बंद करण्याची अपेक्षा पशुपालकांकडून होत आहे.
हा तलाव गावाला लागून असल्याने तसेच या गावात मोठ्या प्रमाणावर पशुपालन असल्याने या तलावात पावसाळ्यापर्यंत पाणी असते परंतु शेतकरी या तलावातून अवैध पाणी उपसा करीत असल्यामुळे पशु पालकांसाठी मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
तसेच तलावावर झाडे-झुडपे काट्या कुपट्या झाल्याने भीतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेरा भरोसा दोन्ही गावाच्या मध्यभागी असल्याने मेरा येथील पशुपालन सुद्धा बारा महिने पाणी पाजण्यासाठी आपले पशूपालन नेतस्तात परंतु हा तलाव देऊळगाव राजा बांधकाम विभागांतर्गत येत असल्याने या तलावाकडे नेहमी बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील पशुपालक अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे पशु पालकांसाठी पाणी राखून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी मागणी सर्वसामान्य पशुपालकांकडून होता आहे.