Home बुलडाणा अंढेरा ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.रुपाली आंबिलकर तर उपसरपंच पदी सौ.लता गजानन सानप...

अंढेरा ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.रुपाली आंबिलकर तर उपसरपंच पदी सौ.लता गजानन सानप यांची निवड!

382

युवक ग्रामविकास परिवर्तन पँनलचा पहिल्याच निवडणुकीत इतिहास!

 

हनिफ शेख
अंढेरा/प्रतिनिधी
देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही नंतरची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अंढेरा ग्रामपंचायतला ओळखले जाते.यावर्षी अंढेरा ग्रामपंचायतची निवडणूक शांततेत व उत्साहात पार पडली.अंढेरा ग्रामपंचायत निवडणूकीत गावातील युवकांनी युवक ग्रामविकास परिवर्तन पँनल उभे करीत आठ जागा लढविल्या.गावविकासाचे ध्येय समोर ठेवत पहिल्याच निवडणूकीत तब्बल पाच जागी विजय मिळवत जवळपास सरपंच पदाचा दावा त्याच दिवशी पक्का केला होता.अन्य दोन सदस्यांनी त्याच दिवशी समर्थन दिल्याने आज झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणूकीत युवक ग्रामविकास परिवर्तन पँनलने इतिहास घडवत पहिल्या निवडणूकीत सरपंच पदी सौ.रुपाली रामदास आंबिलकर तर उपसरपंच पदी सौ.लता गजानन सानप यांची निवड करण्यात आली.तसेच नवानिर्वाचीत सदस्य सौ.सिंदुबाई सुरेश तेजनकर,किरण पालवे,सौ.सुलोचना गजानन कुटे,सौ.रेणुका मधुकर चव्हाण,सतीश वामन देशमुख,हे सदस्य उपस्थित होते.निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पध्दतीने तसेच वार्ड निहाय घेण्यात आली असुन सरपंच रुपाली आंबिलकर व उपसरपंच सौ.लता गजानन सानप यांच्या बाजुने तेरा पैकी सात मत पडली.युवक ग्रामविकास परिवर्तन पँनलवर जो अंढेरावासियांनी विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरवत “अंढेरा गावाचा सर्वागिण विकास”हेच ध्येय समोर ठेवत काम करणार असल्याचे मत नवनिर्वाचीत सरपंच सो,रुपाली रामदास आंबिलकर यांनी व्यक्त केले.मतदान आधिकारी म्हणून देऊळगावा राजाचे नायब तहसिलदार विकास राणे,तलाठी मदन जारवाल,ग्रामविकास आधिकारी पी.बी.खेडेकर,कोतवाल अलका विनकर यांनी काम पाहले.यावेळी अंढेरा ग्रामपंचायत बाहेर मोठ्या संख्येने ग्रामस्त उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांनी जल्लोष केला.अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजवंत आठवले यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.