Home जळगाव सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनानिमित्त फातिमा बी शेख आदर्श सम्मान पुरस्कार वितरण...

सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनानिमित्त फातिमा बी शेख आदर्श सम्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

225

 

रावेर (शरीफ शेख)

मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, कर्जोद,तालुका रावेर या संस्थेच्या वतीने भारतातील पहिल्या सनदी मुस्लिम शिक्षिका फातिमा बी शेख यांच्या नावाने पुरस्कार वितरण करण्यात करण्यात आले.यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षिका, महिला पोलीस कर्मचारी, आरोग्यसेविका, महिला डॉक्टर्स, महिला पत्रकार,महिला लेखक,कवी, इतिहासकार यांसह विविध क्षेत्रात सक्रीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या साठी दि ३० जानेवारी पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. महिलांना सम्मान देऊन त्यांचा गौरव करणे हे अभिमानास्पद कार्य असून या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात पेमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष चौधरी,जि.प.अध्यक्षा सौ रंजनाताई प्रल्हाद पाटील,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी अनिस मो ताहेर हे होते.
कार्यक्रमध्ये यांना देण्यात आले पुरस्कार
डॉ पाकिजा उस्मान पटेल जि प प्रा.शाळा राजवड,डॉ योगिता संदीप पाटील,(मा.फॉ. संचालिका,रावेर),लुबना अमरीन महेबूब अली(मनपा उर्दू हा.स्कूल नं.२ जळगाव),सौ योजना ताई दत्तात्रय पाटील(मा.सभा.नगरसेविका भडगाव),अफशा तरन्नुम मुनिर खान(जि प उर्दू शाळा नं.२ नशिराबाद),सौ कल्पना दिलीप पाटील(जि प.प्रा.शाळा निंभोल ),मिनहाज परवीन नासिर(मु.सर.सै.अ.उर्दू प्रा.शाळा यावल),सौ अलका आनंदा पाटील(जि प शाळा कढोली ता एरंडोल),निकहत परवीन शे बहाउद्दीन(जि प मु उ शाळा अडावद),श्रीमती नीती राजू काकर(जि प शाळा रुईखेडे),सय्यद वसीम बानो वहिद अस्लम(जि प शाळा नं२ रावेर),श्रीमती रेखा सुभाष रुळे(जि.प मराठी क.शाळा नं१ बोदवड),शफीका परवीन नजीर अहेमद(सर.सै.अ.खान उ प्रा.शाळा ,यावल),नर्गिस शे.इलियास(मौ.अ.क.आ. उ.हा.खिर्डी ता रावेर),शाहीन परवीन सईद अहेमद(जि प उर्दू बा शाळा रसलपूर),निकहत अंजुम नाजीमोद्दीन(जि प उ क शा. नं १ मुक्ताईनगर),निदा बी शेख शकील (उत्कृष्ठ विद्यार्थ्यांनी जि.प उर्दू शा कर्जोद ) यांना पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
समाजाच्या प्रत्येक कार्यात महिलांचे अनमोल योगदान :- आमदार शिरीष चौधरी
पुरुषांबरोबर महिलांना हि देशात समान हक्क असून समाजातील कोणत्याही कार्यात महिलांचा चा योगदान महत्वाचा असतो. तसेच सामाजिक शेत्रात कार्य करणाऱ्या प्रकेत्य महिला साम्मानाची मानकरी असते.असे रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी या निमित्त बोलत होते.

यांची होती उपस्थिती:-
कार्यक्रम अध्यक्ष हाजी अनिस शेख, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष दादा चौधरी जि प अध्यक्ष रंजनाताई पाटील,
प्रमुख उपस्थिती ज्ञानेश्वर महाजन,गटशिक्षणधिकारी शैलेश दखणे, खलील तडवी, सय्यद असगर, हरून हबीबी, दिलीप पाटील अयुब मेम्बर,, राजू सवरने, व्यंकट ससाणे, अशोक हरी वणारे, बशीर खान, मोहन महाजन,राजेंद्र तडवी, मिठाराम सावळे,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रितेश वणारे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष शकील शेख यांनी मानले.