Home बुलडाणा कुंडीत गणेशाचे विसर्जन करून वृक्षारोपण केले

कुंडीत गणेशाचे विसर्जन करून वृक्षारोपण केले

708

 

जलप्रदूषण रोखणे काळाची गरज
प्रशांत ढोरे पाटील

 

प्रा , तंजिम हुसेन ,

चिखली : रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशाचे विसर्जन इतरत्र जलप्रदूषण होईल अशा ठिकाणी न करता घरीच कुंडीत विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण केले.
प्रशांत पाटील हे दरवर्षी गणेशाच्या आरतीला गेले असता कुठले ही हार तुरे न नेता त्याठिकाणी गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य गणेशा चरणी अर्पण करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय सहित वाटप करण्याचा उपक्रम ढोरे पाटील दांपत्यांचा दरवर्षी नित्य क्रमाने सुरू असतो.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात असतो परंतु कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी साध्य पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला व विसर्जन ही अत्यंत साध्या पद्धतीत करण्यात आले बहुदा शेवटच्या दिवशी गणेशाचे जे विसर्जन केल्या जात ते प्रामुख्याने नदी,तलाव,विहिरीत केल्या जात असते व त्यातून मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण ही होत असते ते रोखण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील हे गणेशाचे विसर्जन कुठल्याही जलप्रदूषण होईल अशा ठिकाणी न करता घरीच कुंडीत विसर्जन करून त्यात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी कुंडीत वृक्षारोपण करून गणेश विसर्जन केले आहे याद्वारे त्यांनी जलप्रदूषण रोखण्याचा संदेश दिला आहे.