Home जळगाव “एक चम्मच कम, चार कदम आगे” , रोटरी क्लब चोपडा तर्फे मोफत...

“एक चम्मच कम, चार कदम आगे” , रोटरी क्लब चोपडा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

168

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – जिल्ह्यातील रोटरी क्लब चोपडा आयोजित व डिस्ट्रिक्ट ३०३० चा स्टॉप एन.सी.डि. प्रोजेक्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन चोपड्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्री दीपक चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांचा संदेशात म्हणाले रोटरी मेंबर वर्षभर सामाजिक सेवेत व्यस्त असतात आणि अशा या कोरोना काळात त्यांची सुद्धा तब्येत ठणठणीत असणे गरजेचे आहे. म्हणून आज सर्व रोटरी सदस्य व त्यांच्या परिवाराचे रक्तदाब, शुगर टेस्ट, वजन, उंची सोबतच बी एम आय,बी एम आर., टी एस एफ , मसल्स परसेंटेज, बॉडी फॅट पर्सेंटेज,तसेच शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण, अशा अनेक टेस्ट आधुनिक मशीन द्वारे आज करण्यात आल्या.
‘एक चम्मच कम, चार कदम आगे’ या स्टॉप एनसीडी प्रकल्प बाबत बोलतांना रोजच्या जीवनात साखर तेल व मीठ कमी करण्याचे तसेच विशेष आहार आणि व्यायमाचे महत्व डॉ दीपक चौधरी यांनी आपल्या भाषणात पटवुन दिले.
सदर शिबिरासाठी रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ.नीता जैस्वाल, डॉ वैभव पाटील,पुनम गुजराथी,मुरलीधर पाटील, विलास एस.पाटील, डॉ.पराग पाटील , पी. बी. पाटील,विनोद अग्रवाल,महेंद्र बोरसे,डॉ.शेखर वारके,अर्पित अग्रवाल,चेतन टाटीया,चंद्रशेखर साखरे,दीपक लोहना,ईश्वर सौदनकर व चोपडा रोटरी चे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच सदर प्रकल्पास न्यू लाइफ सेंटरचे संचालक श्री मितेश भाई सुगंधी यांचे विशेष सहकार्य तर डिस्ट्रिक्ट ३०३० चे स्टॉप एनसीडी प्रोजेक्ट चेअरमन डॉ. जुगल चिनोरिया व सह-प्रांतपाल योगेशजी भोळे यांचे मार्गदर्शन लाभले.