संतापजनक घटना ,
अमीन शाह ,
मुंबई ,
पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कारवाईत अटक केलेल्या महिलेचे नाव सोनम सिंग ( वय 40 ) असून ती मीरा रोड येथील रहिवासी आहे . सोनम ला 18 वर्षाची मुलगी आहे . या मुलीचा वेश्यागमनासाठी तीने दीड लाखाचा सौदा लावला होता . मुलगी पहिल्यांदाच शरिरसंबधांना समोरे जाणार असल्याने या महिलेने तीचा जादा बोली लावली होती अशी माहिती मिळाली आहे . याप्रकरणाची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर उपायुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड व त्यांच्या पथकाने या कारवाईसाठी बनावट ग्राहक तयार करुन सोनम सिंग ला सापळ्यात अडकवून अटक केली .
सोनमने पोलिसांच्या बनावट ग्राहकाला सोमवारी नेरुळच्या शिरवणे गावातील एका हॉटेलची रुम बुक केली होती त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोनम सिंग ही मीरा – भाईंदर येथून कारमधुन मुलीला घेऊन आल्यानंतर पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला . यानंतर सोनमवर गुन्हा नोंदवण्यात आला असून , मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे .