Home महत्वाची बातमी लोकशाही च्या चौथ्या आधारस्तंभाला धमकी…!

लोकशाही च्या चौथ्या आधारस्तंभाला धमकी…!

505

 

“आलेगाव येथील प्रकार”

 

जफर खान

अकोला – पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पत्रकार शोएबोद्दीन यांना धमकी देण्यात आली

मागील ५ ते सहा वर्षा पासून पत्रकार शोएबोद्दीन यांनी वारंवार पेपर न्युज पोर्टल व ऑनलाईन मिडिया द्वारे वार्ड क्रमांक ४ येथील व गावातील समस्या मांडली व स्वतःच्या घरा समोरील नाली व रस्त्याची बातमीद्वारे दुर्दशा सुद्धा दाखवली होती. या बाबतचे निवेदन सुद्धा आलेगाव ग्रा.पं. ला देण्यात आले होते. परंतु बातमीचा रोष मनात घेऊन अजून पर्यत पत्रकाराचे घरा समोरील नालीचे व रस्त्याचे काम केले नाही परंतु ६ वर्ष वारंवार पाठ पुरावा करून आत्ता ग्रा.पं. कळून फक्त नालीचे बांधकाम करण्यात येत होते परंतु काही नागरिकांनी हे काम होऊ दिले नाही , पत्रकारांनी या बाबत विचारले असता काही जणांनी तुला पाहून घेऊ अशी धमकी दिली , सांगुन पत्रकाराले धमकावले , काही जणांनी पत्रकाराले समजाऊन सांगितले या बाबत सद्या पोलिसात तक्रार करण्यात आली नाही . “पत्रकार संरक्षण समिती” चे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी या विषयाची दखल घेतली आहे.