
ती काळरात्र ठरली त्यांची शेवटची ???
सैलानी परिसरातील दुर्देवी घटना
बुलडाणा ,
चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई जवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे.सैलानी बाबा देशभरातील लाखो सर्वधर्मिय भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक लोक येथे उपचारासाठी येथे येतात व दरगेचा आसरा घेऊन किंवा झोपडी बांधून तेथे राहतात .सोमवारी रात्री सैलानी परिसरात जोरदार पाऊस पडल्याने दरगेत राहणाऱ्या दोघ माय लेकींनी सांडू खां जिन्नत खां यांच्या खोलीत रात्री आसरा घेतला होता त्यांना काय माहीत ही रात्र त्यांची शेवट ची रात्र ठरणार आहे गेल्या अनेक दिवसा पासून सैलानी परिसरात रस्त्याचा काम सुरू असून रस्त्याच्या कामा मुळे अनेक भितींना तळे गेले असून या पूर्वी अनेक घरे कोसळले आहेत मात्र त्या वेळी जीवित हानी झाली नवहती कामात हलगर्जीपणा करणाऱ्या व दोघा माय लेकींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधा चा गुन्हा दाखल करून त्या माय लेकी च्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मांगणी परिसरातील रहिवाश्यांनी केली आहे या घटनेत मृत्यू झालेल्या आईचे नाव सुगंदाबाई काजळे वय 55 वर्ष व त्यांची मुलगी कु ललिता काजळे वय 18 वर्ष दोघे रा बुटी खंडवा,ता खालवा जि खंडवा,मध्यप्रदेश येथील रहिवासी होते. मागील काही दिवसापासून ते उपचारासाठी सैलानी बाबा दरगह येथे आलेले होते. सदर घटनेची माहिती मिळताच सैलानी बीट जमादार यशवंत तायडे घटनास्थळी पहोचले व त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवले आहे. या प्रकरणी रायपुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
कार्यवाहीची मांगणी ,
दोघा माय लेकींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व रस्ता कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मांगणी परिसरातील काही लोक करीत आहे ,











































