महत्वाची बातमी

सासरच्यांनी नवविवाहित सुमय्या परवीन यास मारून टाकले ,

Advertisements
Advertisements

पोलिसांनी अवघ्या काही तासात केले गजाआड ,

अमीन शाह

अकोला – सुनेने फाशी लावून आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पती, सासरा व सासूचा जुने शहर पोलिसांनी तपासांती आज सायंकाळी डाव उघड केला. यामध्ये पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. १२ तासाच्या आत या हत्येचा छडा लावल्याने जुने शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जुने शहर पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या गुलवाडे प्लॉट येथे शेख इमरान याचा विवाह एक जानेवारी 2020 मध्ये सुमय्या परवीन हिच्याशी झाला होता. माहेरून पैसे आणण्यासाठी पती, सासरा नेहमी तिला तगादा लावत होते. त्यावरून त्यांच्यामध्ये रोज भांडण होत होते. शेख इमरान व सासरा शेख जब्बार हे मिस्त्रीचे काम करीत होते. पैसे आणण्यावरून पती, सासरा आणि सासू यांनी तिचा रविवारी रात्री छळ केला. त्यानंतर या तिघांना ही राग अनावर झाला. त्यांनी तिचा कपड्याच्या सहाय्याने गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव या तिघांनी केला. या तिघांनी तिला तत्काळ सकाळी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी जुने शहर पोलिस उपनिरीक्षक सुजित कांबळे यांनी यामध्ये सकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांना शंका आल्याने डीबी पथकास तपास करण्याचे आदेश दिले. डीबी पथकाने यामध्ये पती शेख इमरान, सासरा शेख जब्बार, सासू रजिया बी हिला चौकशीसाठी बोलाविले. तसेच वैद्यकीय अहवालावरून पोलिसांची शँका खरी ठरली. चौकशीअंती या तिघांनी गळफास देऊन तीचा खून केल्याचे कबूल केले. जुने शहर पोलिसांनी यामध्ये पती, सासरा, सासू या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुजित कांबळे, सदाशिव सुळकर, अनिस पठाण, महेंद्र बहादूरकर, अनिल खेडेकर, नितीन मगर, धनराज बायस्कर यांनी कारवाई केली.https://youtu.be/TU8IEaAQFu4

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...