Home जळगाव कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या पोलिस पाटील उल्हास लांडगे यांच्या वारसास मिळावी ५०...

कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या पोलिस पाटील उल्हास लांडगे यांच्या वारसास मिळावी ५० लाख विम्याची रक्कम…

279

जळगाव पोलिस पाटील संघटनेकडून विविध मान्यवरांना देण्यात आले निवेदन…

अमळनेर :- कोविड १९ अंतर्गत सेवा बजावत असताना संसर्ग होवून मृत पावलेल्या पोलिस पाटील उल्हास लांडगे यांच्या वारसास सरकारने घोषित केलेल्या विम्याची रक्कम त्वरित मिळाली, अशी मागणी पोलिस पाटील संघटनेने केली आहे.

सदर मागणीबाबत संघटनेकडून आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यासह विविध शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने घोषित केले आहे की, कोरोना समितीत काम करणाऱ्या सदस्यास संसर्ग होवून मृत्यू ओढवल्यास ५० लाख रुपयाचा विम्याचा लाभ मिळेल. त्यानुषंगाने जवखेडा येथील मयत कै. उल्हास नामदेव लांडगे यांच्या वारसास ५० लाख रुपये विम्याची रक्कम मिळावी. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.