यवतमाळ – पुसद कार्यालयातील वीज वितरण कंपनी उपविभागाच्या लेखापाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्याने रंगेहात अटक केली.
पुसद येथील वीज वितरण कंपनी उपविभागाचे सहाय्यक लेखापाल वर्ग ३ चे आरोपी राजेश भानुदास गवळी याने मीटर रिडींगचे काम करण्याकरीता आवश्यक असलेली व सद्या बंद असलेली आयडी चालू करण्याकरीता वीज वितरणच्या कंत्राटदाराकडून ५ हजाराची लाच मागीतली होती. त्यावरुन आज लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पुसद येथील एका पानटपरीवर सापळा रचला असता आरोपीने पानटपरीवरुन ५ हजार रुपये स्विकारले असता त्यास ताब्यात घेवून पुसद शहर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
Post Views: 430