
जिल्ह्यातील दुसरा पोलीस स्टेशन
जमीर शाह
डोणगांव , दि. २५ :- डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी २५ जुलै रोजी कोरोना पोजेटीव्ह निघाल्याने सुरक्षिततेची उपाय योजना म्हणून येथील पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी हे होम कोरोन्टाईन केले व येथील पोलीस स्टेशनचे कारभार हा मेहकर पोलीस स्टेशन मधून चालणार.
डोणगांव पोलीस स्टेशन मध्ये ३४ पोलीस कर्मी आहेत यात २ अधिकारी आणि ३२ पोलीस कर्मचारी आहेत मात्र यातील एक पोलीस कर्मचारी हा २५ जुलै रोजी कोरोना पोजेटीव्ह मिळून आल्याने येथील पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी हे होमकोरोन्टाईन करून येथील पोलीस स्टेशनचा कारभार हा मेहकर वरून करण्यात येणार असल्याची माहिती मेहकर विभागीय पोलीस अधिकारी दिलीप तडवी यांनी दिली तर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तडवी यांनी स्वतःहा डोणगांव येथे येऊन पोलीस स्टेशनचे कारभार मेहकर पोलीस स्टेशन मधून चालणार असल्याचे सूचना फलक पोलीस स्टेशनच्या गेटवर लावले.
जिल्ह्यतील दुसरी घटना
या पूर्वीही बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगावराजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार हे करोना पाझेटिव्ह आल्याने येथील संपूर्ण पोलीस ठाणे बंद करण्यात आले होते व येथील कारभार खामगाव वरून सुरू आहे आता यात डोंनगाव पोलीस ठाण्याची भर पडली आहे .












































