Home जळगाव सुकि नदी ला आले पाणी, परीसरातील शेतकरी झाले आंनदीत……

सुकि नदी ला आले पाणी, परीसरातील शेतकरी झाले आंनदीत……

129

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील काल पाल येथील गारबर्डी सुकी नदीवरील मोठं धरण भरून थोडे पाणी नदीपात्रात वाहू लागले होते,पण आज सकाळी लोहारा येथील लहान धरणं ही भरून ते पाणी सुमारे साडे नऊच्या आसपास लोहारा, गौरखेडा गावे पास करून कुंभारखेडा सुकी नदीवरील पूलाखालून वाहत आहेत, यामुळे लोहारा, गौरखेडा,चिंचाटी,खिरोदा,कुंभारखेडा, उटखेडा, कुसुंबा,विवरा,चिनावल, वडगाव,सह वाघोदा,निंभोरा,दसनूर या परिसरात गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतीला फायदा होतो.

सुकी नदीच्या पात्रात पाणी आल्याने, कुंभारखेडा येथील प्रगती शील शेतकरी,ललित चौधरी यांनी सुकी नदी मातेचे दर्शन घेऊन, मनोभावे पूजा करून नारळ अर्पण करून,सुकी तेरा ही सहारा , असा जय घोष यावेळी उपस्थित युवा शेतकरी, महेंद्र महाजन, चंद्रकांत पाटील, दुर्गेश महाजन,सामाजिक कार्यकर्ते विलास ताठे सह अनेक मान्यवर यांनी सुकी नदी मनोमन आभार मानले,
तसेच सुकी नदी वाहण्यामुळे सदर शेतकरी आंनदीत झाले, यामुळे संबंधित परिसरात पाण्याची पातळी नक्कीच वाढेल, विहीरी, कुपनलिका यांना खूप मोठ्या फायदा होवून आज उन्हाळ्याची चिंता सदर शेतकरी वर्गाची कमी होईल या आशेने सदर परीसरातील शेतकरी खरे सुखावले आहे, तर ह्या पाण्यामुळे नदी सुमारे दिवाळीच्या पार पर्यंत नक्की वाहत राहो अशी त्यांनी आशा व्यक्त केली.