Home मराठवाडा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र च्या वतीने डॉक्टरांना डिजिटल थर्मोमिटर (Infrared)...

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र च्या वतीने डॉक्टरांना डिजिटल थर्मोमिटर (Infrared) चे वाटप

35
0

वलांडी – कोरोना महामारीच्या परिस्थितीतही आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणारे डॉक्टर सुरक्षित राहावेत इतर दैनंदिन रुग्ण तपासणी करत असताना त्या रुग्णाच्या माध्यमातून डॉक्टरांना कोरोना आजार होऊ नये या सामाजिक बांधीलकीतून वलांडी येथील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र च्या वतीने डॉक्टरांना डिजिटल इन्फ्रारेड थर्मोमिटर चे वाटप करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रभर अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यात आणि भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारी बाबूंना वठणीवर आणनारी संघटना म्हणून प्रसिद्ध असलेल्या अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे डॉक्टर लोकांना ठराविक अंतरावरून रुग्णाचे तापमान चेक करता यावे यासाठी डिजिटल इन्फ्रारेड थर्मोमिटर चे वितरण मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.या वेळी, उद्योजक श्री रफीकभाई सय्यद, उपसरपंच दिनेश पाटील, माजी उपसभापती तुकाराम पाटील, रौफ शेख, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मो.रफी सौदागर, डॉ.जावेद सय्यद, डॉ.हमीद अचवलकर, खलील मुंजेवार, पत्रकार नरेश बिरादार, रिपाई चे विलास वाघमारे,हकीम सौदागर, धनाजी बनसोडे,विष्णू पाटील, सूर्यकांत महाजन,यासीन मुरशेद,साबेर पठाण, महेतब बौडीवाले, खालेद खुरेशी , फयाज बौडीवाले, खुतुब शेख, शफीक सौदागर, जमील मुंजेवार, तय्यब शेख, मजीद खुरेशी, रसूल सय्यद, संगीता ताई, अजय बनसोडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हा सचिव शादुल बौडीवाले, शाखाध्यक्ष सगीर मोमीन, अक्रम शेख, यांनी परिश्रम घेतले.

Unlimited Reseller Hosting