Home महत्वाची बातमी करोना आजार एक घोटाळा , ??? महिला आमदाराच्या नावाने बनावट मेसेज वायरल...

करोना आजार एक घोटाळा , ??? महिला आमदाराच्या नावाने बनावट मेसेज वायरल करणाऱ्या भाजपा च्या महिला पद्धधिकार्यास अटक ,

162

अमीन शाह ,

‘करोना आजार हा घोटाळा असून पैसे उकळण्यासाठी नागिरकांना पॉझिटिव्ह असल्याचे दाखवले जात आहे’, अशा वादग्रस्त विधानाची ध्वनीफित आमदार गीता जैन यांच्या नावाने व्हायरल करण्यात आली आहे. मात्र, ही ध्वनीफित बनावट अससल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक कऱण्यात आली आहे.

सध्या मीरा भाईंदर शहरामध्ये अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावाची एक ध्वनीफित व्हायरल झाली होती. केंद्राकडून एका रुग्णामागे दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळेच पैसे उकळण्यासाठी रुग्ण संख्या फुगवली जात आहे, रुग्णांना पॉझिटिव्ह दाखवले जात आहे आणि हा मोठा घोटाळा आहे, असे वक्तव्य गीता जैन यांनी केल्याचे भासविण्यात आले होते. यामुळे घबराट पसरली होती. मात्र, हे माझे वक्तव्य नसून मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगत गीता जैन यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. नवघर पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास करून रंजू झा या महिलेला अटक केली आहे.
रंजू झा या भारतीय जनता पक्षाच्या उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या मीरा भाईंदर मतदारसंघाच्या उपाध्यक्ष आहेत. आरोपी झा यांना या प्रकऱणी अटक करण्यात आली होती. न्यायालाने जामिनावर त्यांची सुटका केल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.