Home मराठवाडा माता न तू वैरिणी…!

माता न तू वैरिणी…!

16
0

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला नदीच्या पात्रात फेकून देणाऱ्या महिलेचा पोलिसांनी लावला छडा…!!

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एक दिवसाच्या बाळाला नदीच्या पात्रात फेकून जीवे मारणाऱ्या निर्दयी महिलेचा घनसावंगी पोलिसांनी अवघ्या बारा तासात छडा लावला असून या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य एका आरोपीच्या शोधात पोलीस आहेत. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक येथील नारोळा नदीच्या पात्रात शुक्रवारी एक नवजात अर्भक पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना आढळून आले. अशी माहिती घनसावंगी पोलिसांना पोलीस पाटलांनी कळवली होती. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. घनसावंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. , दरम्यान या नवजात अर्भकाचा साडीने गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. . बाळाचा खून करण्यात आला असल्याची पक्की खात्री पटल्याने पोलीसांपुढे आव्हान वाढले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, विभागीय पोलीस अधिकारी सिडी शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, मनोहर खिळदकर, पोलीस उपनिरीक्षक कापुरे यांच्यासह पोलीस कर्मचारी राऊत, देवडे वैराळ, जाधव वैद्य, केंद्रे,मिरा वैद्य यांनी कामगिरी बजावली.