Home नांदेड नांदेड आज जिल्ह्यात ८३ बाधितांची भर तर कोरोनातून १९ रूग्ण बरे व...

नांदेड आज जिल्ह्यात ८३ बाधितांची भर तर कोरोनातून १९ रूग्ण बरे व दोघांचा मृत्यू

119

नांदेड,दि. २५ ( राजेश एन भांगे ) – जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 83 व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर 19 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 445 अहवालापैकी 327 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 252 एवढी झाली असून यातील 672 एवढे बाधित बरे झाले आहेत. 513 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे.

शुक्रवार 24 जुलै रोजी मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील 65 वर्षाची 1 महिला तर शनिवार 25 जुलै रोजी खय्युम फ्लॉट खोजा कॉलनी नांदेड येथील 50 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 56 एवढी झाली आहे.
आज बरे झालेल्या 19 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 2 व खाजगी रुग्णालयातील 13 बाधितांचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 672 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपसणीद्वारे नवीन बाधितांमध्ये तरोडानाका 32 वर्षाची 1 महिला, माणिकनगर येथील 49 वर्षाचा 1 पुरुष, वजिराबाद नांदेड येथील 12,12,54,75 वर्षाचे 4 पुरुष व 7 वर्षाची एक मुलगी, देगलूर नाका नांदेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष व 45 वर्षाची 1 महिला, पुर्णारोड नांदेड येथील 40 वर्षाची 1 महिला, सिंधी कॉलनी नांदेड येथील 30 आणि 68 वर्षाचे 2 पुरुष, भावसार चौक नांदेड येथील 18 वर्षाचा 1 पुरुष व 40 वर्षाची 1 महिला, नवीन कौठा नांदेड येथील 34 वर्षाचा 1 पुरुष, राजनगर नांदेड येथील 45 वर्षाचा 1पुरुष, गुजराथी शाळा नांदेड येथील 22 व 56 वर्षाचे 2 पुरुष, काबरानगर नांदेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष व 25वर्षाची 1 महिला, दत्तनगर नांदेड येथील 50 वर्षाची 1 महिला, शाहाजीनगर मालेगाव रोड येथील 26 व 54 वर्षाचे 2 पुरुष, नांदेड हडको येथील 22,26,32,50 वर्षाचे 4 पुरुष तर 27,28,33, 36,45,65 वर्षाच्या 6 महिला, नेरली नांदेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, लिंबगाव येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, भोकर येथील 58 वर्षाची 1 महिला, हदगाव तालुक्यातील बामणी येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, तामसा येथील 60 वर्षाची 1 महिला, शिवाजीनगर मुखेड येथील 37 वर्षाचा 1 पुरुष, मेन मार्केट मुखेड येथील 27,35,32,80 वर्षाचे 4 पुरुष व 28 व 70 वर्षाच्या 2 महिला, मुखेड वडगाव येथील 22 वर्षाचा 1 पुरुष तर 20,24,66 वर्षाच्या 3 महिला, धोबीगल्ली मुखेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, फुलेनगर मुखेड येथील 22,37 वर्षाचे 2 पुरुष, जहूर मुखेड येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील अंबुलगा 25,46,74 वर्षाचे 3 पुरुष, अहिल्याबाई होळकरनगर मुखेड येथील 22, 43 वर्षाचे 2 पुरुष व 22,42,60 वर्षाच्या 3 महिला, मुखेड नांदेड येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, मुक्रमाबाद मुखेड येथील 30,35,65 वर्षाचे 3 पुरुष व 45 व 60 वर्षाच्या 2 महिला, गोकुळनगर देगलूर येथील 36,52 वर्षाचे 2 पुरुष व 27 वर्षाची 1 महिला, सुगाव देगलूर येथील 60 वर्षाची 1 महिला, देगलूर भुईगल्ली येथील 17 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर लाईनगल्ली येथील 55 वर्षाची 1 महिला, कृषि विभाग बिलोली येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, देशमुखनगर बिलोली येथील 30 वर्षाची 1 महिला, चौहान गल्ली नायगाव येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, धर्माबाद येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, धर्माबाद बालाजी गल्ली येथील 18,45,49 वर्षाचे 3 पुरुष व 17,42 वर्षाच्या 2 महिला, मोंढा मार्केट ग्रामीण रुग्णालय उमरी येथील 30 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे.

जिल्ह्यात 513 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 98, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 184, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 29, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 12, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 5, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 61, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 32, उमरी कोविड केअर सेंटर 10, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 1, लोहा कोविड केअर सेंटर येथे 10, हदगाव कोविड केअर सेंटर 3, भोकर कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 10, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 5, खाजगी रुग्णालयात 45 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 505,
घेतलेले स्वॅब- 11 हजार 999,
निगेटिव्ह स्वॅब- 9 हजार 653,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 83,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 252,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 30,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 4,
मृत्यू संख्या- 56,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 672,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 513,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 270.

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.