Home विदर्भ शेतकरी सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची यादी तपासणार – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री...

शेतकरी सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची यादी तपासणार – दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

102

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा, दि 25 :- शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यात 90 हजार 665 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. मात्र अपात्र ठरलेल्या 43 हजार 827 शेतकरी तसेच यादीत नाव न आलेले 6 हजार 61 अशा एकूण 49 हजार 888 शेतकरी खात्यांची तपासणी करण्यासाठी तालुका निहाय यादी बँकांकडून प्राप्त करुन घ्यावी. तहसिलदार, सहायक उपनिबंधक, तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्फत ही यादी तपासावी. बँकांनी कोणत्या कारणाने कर्जमाफीचा लाभ दिला नाही याचा शोध घ्यावा अशा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत पीक कर्ज वाटप आणि कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी श्री केदार यांनी सदर सूचना दिल्यात. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार ,जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बिरेंद्र कुमार उपस्थित हते.

जिल्ह्यात पूर्वीच्या कर्जमाफीसाठी 1 लक्ष 40 हजार 553 खातेधारकांची यादी अपलोड करण्यात आली होती. यामध्ये 90 हजार 665 लाभार्थी यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र 43 हजार 827 शेतकरी अपात्र ठरले होते. या याद्या बँकांकडून मागवून शेतकरी कोणत्या कारणाने अपात्र ठरले याचा अभ्यास करावा.

जिल्हयातील राष्ट्रीयकृत बँकांनी खरीप पिक कर्जाचे उद्दिष्ट केवळ 35 टक्के पूर्ण केले असल्यामुळे श्री केदार यांनी बँकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये अलाहाबाद बँक व पंजाब नॅशनल बँकेची कर्जप्रकरणे त्यांच्या विभागीय बँकेकडे मंजूरीसाठी जात असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक बिरेंद्र कुमार यांनी सांगितले. जिल्ह्यात 2 लाख खातेधारक असताना केवळ 35 हजार 759 शेतकऱ्यांचे अर्ज पीक कर्जासाठी आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज नको की त्यांना काही इतर अडचणी आहेत हे समजून घेण्यासाठी पूर्वीच्या शेतकरी कर्जमाफीच्या तालुका निहाय याद्या मागवाव्या. त्याचा अभ्यास करून या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा लाभ दिला की नाही याची खात्री करण्यासोबतच त्यांना येत असलेल्या अडचणी समजून घ्याव्यात असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

वर्धा शहरातील झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप करण्यासाठी पुलफैल , आनंदनगर, अशोकनगर येथील झोपडपट्टी धारकांच्या जागेची भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करुन त्यांना पट्टे वाटप करावे. जागा खाजगी असल्यास नगर पालिकेने त्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन भूमी अभिलेख कार्यालयास मोजणी करीता उपलब्ध करुन दयावे. असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्य परिवहन कर्मचारी संघटनेला कामगार भवन बाधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल यासाठी नगर पालिकेने जागा उपलब्ध करुन दयावी अशा सूचनाही श्री केदार यांनी यावेळी दिल्यात.